Home > News Update > विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्या ताफ्याचा अपघात

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्या ताफ्याचा अपघात

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्या ताफ्याचा अपघात
X

जळगाव: सध्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर कोरोनाचा आढावा घेण्यासाठी खान्देशाच्या दौऱ्यावर आहेत. आज ते नाशिक हून आपला नियोजित दौरा आटपून धुळे मार्गे जळगाव जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार हरीभाऊ जावळे यांचे कोरोना ने निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेण्यासाठी जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला.

हा अपघात नशिराबाद जवळ झाला. सध्या जळगाव – चिखली या एक्सप्रेस हायवेचं काम सुरु आहे. त्यातच राज्यात सध्या पाऊस सुरु आहे. त्यामुळं रस्त्यामध्ये फडणवीसांच्या ताफ्यातील एका गाडीचं ब्रेक फेल झाल्यानं ती गाडी ताफ्यातील गाड्यांवर आदळली. या अपघातात दरेकर किरकोळ जखमी झाले आहेत. असं त्यांच्या स्विय सहाय्यकाने मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगितले. तसंच देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर सुखरुप असल्याचं त्यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगितलं आहे.

दरम्यान फडणवीस यांचे आत्तापर्यंत अनेक वेळा अपघात झाले आहेत.

Updated : 8 July 2020 4:41 PM GMT
Next Story
Share it
Top