Home > News Update > मुन्ना यादवच्या भेटीचं फडणवीसांकडून समर्थन

मुन्ना यादवच्या भेटीचं फडणवीसांकडून समर्थन

मुन्ना यादवच्या भेटीचं फडणवीसांकडून समर्थन
X

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला (Kareem Lala) यांच्या भेटीविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन भाजपने संधी साधत शिवसेना आणि कॉंग्रेसवर निशाणा साधला. माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन संजय राऊत यांच्या वक्तव्यावर कॉंग्रेस (Congress) गप्प का? असा सवाल उपस्थित करत कॉंग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.

संबंधित बातम्या...

“इंदिराजींसारख्या सर्वोच्च नेत्यावर आरोपानंतर काँग्रेस गप्प का? निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस अंडरवर्ल्डची मदत घ्यायची का? पोलिस आयुक्त अंडरवर्ल्डच्या संमतीने ठरवत होता काय? मुंबईत स्फोट घडवणाऱ्यांशी काँग्रेसचा काय संबंध? सोनियाजी, राहुलजी, प्रियंकाजी उत्तर द्या...” असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

यावर महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही फडणवीस यांना प्रत्युत्तर देतांना “कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन फडणवीस यांना भेटायला वर्षा बंगल्यावर आला होता. मुन्ना यादव (Munna Yadav) या अट्टल गुन्हेगाराला त्यांनी फक्त वाचवलंच नाही तर त्याला सरकारी पदही दिलं होतं. फडणवीस यांना या विषयावर बोलण्याचे नैतिक अधिकार नाहीत.” असा खळबळजनक आरोप केला.

देवेंद्र फडणवीस यांनी आज बाळासाहेब थोरात यांच्या आरोपांना “मी कधीही गुन्हेगारांना संरक्षण दिलेले नाही. मुन्ना यादव हे तीन वेळा नागपुरमधुन नगरसेवक म्हणुन निवडून आले होते. संजय राऊत यांच्या वक्तव्यावरुन जो वाद निर्माण झाला त्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न करु नका.” असं प्रत्युत्तर दिलं आहे.

Updated : 17 Jan 2020 7:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top