कोरोना व्हायरसच्या या स्टेज तुम्हाला माहीत आहेत का?

158
coronavirus in Indicoronavirus in India, coronavirus in india update,coronavirus in Italy, coronavirus in tamil nadu, coronavirus in india death ,Coronavirus, Corona, Mask, corona vaccine update, corona means, corona in Noida, corona vaccine usa, corona meaning English, corona meaning in tamil, कोरोना वायरस का गाना, कोरोनावायरस सॉन्ग, corona virus in Noida, कोरोनाव्हायरस व्हिडीओ, कोरोना खबर, कोरोना वायरस सॉन्ग, कोरोनावायरस के बारे में बताओ, कोरोना वायरस बद्दल माहिती, कोरोना वायरस कैसा होता है, कोरोना वायरस कब खत्म होगा, कोरोना वायरस की दुआ, कोरोना वायरस गाणे, कोरोना वायरस अपडेट,महाराष्ट्र एकूण रूग्ण, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, नागपूर, कल्य़ाण डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे, यवतमाळ, अहमदनगर, पनवेल, सातारा, उल्हासनगर, वसई विरार, पालघऱ, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, रत्नागिरी, कोल्हापूर, गोंदिया,coronavirus Live Updates, Global Death, India Death Update, lockdown, migration in India, Italy Death Update, united states Corona virus Update, USA death Update, toll India, new cases, new cases in Maharashtraa, coronavirus in india update,coronavirus in Italy, coronavirus in tamil nadu, coronavirus in india death ,Coronavirus, Corona, Mask, corona vaccine update, corona means, corona in Noida, corona vaccine usa, corona meaning English, corona meaning in tamil, कोरोना वायरस का गाना, कोरोनावायरस सॉन्ग, corona virus in Noida, कोरोनाव्हायरस व्हिडीओ, कोरोना खबर, कोरोना वायरस सॉन्ग, कोरोनावायरस के बारे में बताओ, कोरोना वायरस बद्दल माहिती, कोरोना वायरस कैसा होता है, कोरोना वायरस कब खत्म होगा, कोरोना वायरस की दुआ, कोरोना वायरस गाणे, कोरोना वायरस अपडेट,

कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. जगातील १९२ देश कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार साडेतीन लाखांहून अधिक लोकांना या व्हायरसची लागण झाली असून १५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचे काही टप्पे आहेत. त्यानुसार या व्हायरसची व्याप्ती समजून घेता येईल. भारतात सध्या कोरोना स्टेज-२ मध्ये आहे. राज्यातही कोरोना स्टेज-२ मध्ये आहे. तो स्टेज-३ मध्ये जाऊ नये यासाठी राज्य सरकारकडून संचारबंदी आणि इतर उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र केरळ आणि देशाच्या काही भागांत स्टेज-३ मध्येही पोहोचला आहे.

कोरोना व्हायरसच्या स्टेज काय असतात आणि त्या कशा वाढतात हे जाणून घेऊ…

स्टेज-१

हा कोरोनाचा पहिला टप्पा आहे. यामध्ये परदेशातून आलेला व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून येतात. त्याला ‘होम क्वारंटाईन’ करण्यात येतं. कुटुंबियांपासूनही वेगळं ठेवण्यात येतं. तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास रुग्णालयात उपचार करण्यात येतात. त्या व्यक्तीकडून इतर कोणाला संक्रमण होणार नाही याची काळजी घेतली जाते.

स्टेज-२

कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये अशा व्यक्तीला कोरोनाची लागण होते जी परदेशातून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून सर्व भारतीय विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. या नागरिकांच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’चे शिक्के मारले जात आहेत. याशिवाय १४ दिवस घराबाहेर निघणार नाही आणि कुटुंबियांपासूनही लांब राहील असं शपथपत्र लिहून घेतलं जातंय.
मात्र, परदेशातून आलेल्या अनेकांनी या शपथपत्राचं उल्लंघन केल्याचं समोर आलंय. विलगीकरणात राहण्याच्या सूचना करूनही ही मंडळी कळत नकळत अनेकांच्या संपर्कात आली. त्यामुळे इतरांनाही कोरोनाची लागण झाली.

स्टेज-३

स्टेज-३ हा कोरोनाचा गंभीर टप्पा आहे. स्टेज-१ मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण स्वतः परदेशातून आलेला असतो. स्टेज-२ मध्ये परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होतो. मात्र, स्टेज-३ मध्ये कोरोनाचा स्रोत समजून येत नाही. वेगवेगळ्या मार्गाने संसर्ग होत याची लागण होते.
स्टेज-३ मध्ये स्रोत माहीत नसल्यामुळे आपण त्याला वेगळं करू शकत नाही. तो स्रोत कुठे आहे, त्याने किती लोकांना संसर्ग केला आहे हे सांगणं कठीण आहे.

यावर उपाय काय?

१४ दिवसांसाठी सर्वांनी घरात राहणे आणि बाहेर न निघणे म्हणजेच संपूर्ण लॉकडाऊन हाच यावरचा एकमेव उपाय आहे.

या लॉकडाऊनने काय होईल?

प्रत्येकजण घरात बंद आहे. जो संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला नाही तो सुरक्षित आहे. जो अज्ञात स्रोत आहे तो ही आपल्या घरात बंद आहे. त्याची लक्षणं वाढली तर तो रुग्णालयात जाईल आणि समोर येईल. लॉकडाऊन दरम्यान त्याच्या कुटुंबियांना लागण झाल्याची शक्यता आहे. मात्र, हा स्रोत घरातच असल्याने संपूर्ण शहर संक्रमित होण्यापासून वाचेल. जर लॉकडाऊन नसतं तर हा स्रोत सापडला नसता आणि हजारो लोकांमध्ये कोरोना पसरला असता.