Home > News Update > त्यामुळे तुम्हाला आज घरी बसावं लागलं; अजित पवारांचा मुनगंटीवारांना टोला

त्यामुळे तुम्हाला आज घरी बसावं लागलं; अजित पवारांचा मुनगंटीवारांना टोला

त्यामुळे तुम्हाला आज घरी बसावं लागलं; अजित पवारांचा मुनगंटीवारांना टोला
X

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या एका वक्तव्याची आठवण करुन देत त्यांच्या वक्तव्याला आज प्रतिउत्तर दिलंय.

मुनगंटीवार मंत्री असताना म्हणाले होते की, “आबा हयात नाहीत म्हणून आमचे सरकार आले. मात्र, मी मुंनगंटीवार याना सांगतो.. आज आबा जरी नसले तरी, आमच्यासोबत आबांची पुण्याई आणि जिवाभावाची माणसं आहेत त्यामुळे तुम्हाला आज घरी बसावं लागलं, ताम्रपट घेऊन कोणच जन्माला येत नसतं याच भान मुनगंटीवार यांनी ठेवावं, जोपर्यंत बहुमत आमच्या सोबत आहे, तोपर्यंत आमच्या सरकारला धोका नाही हे भाजप नेत्यांनी चांगल्याप्रकारे समजून घ्यावे.

भाजप नेत्यांच्या महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही असा दावा सतत केला जातोय. याविषयी विचारणा केली असता, “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जोपर्यंत त्यांच्या मनात आहे, तोपर्यंत राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका असणार नाही. यामुळे इतर कोणाच्या वक्तव्याला फार महत्त्व देणं गरजेचं नाही असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

महिलांवर होत असलेल्या हल्ल्यांचा विचार करून याबाबत कडक कायदा करण्याचा आम्ही विचार करतोय. मात्र, याबाबत सर्वच पक्षांनी कसल्याही पद्धतीचं राजकारण आणता कामा नये. अधिवेशनात याबाबत योग्य निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आर आर पाटील यांच्या अंजनी येथील समाधीस्थळाच दर्शन घेऊन त्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर अजित पवार बोलत होते.

इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्ट प्रतिक्रिया देण्याचं मात्र अजित पवार यांनी टाळलं. अद्याप याबाबतची पूर्ण माहिती मला नाही, त्यामुळे पूर्ण माहिती घेतल्याशिवाय प्रतिक्रिया देणं हे उचित ठरणार नाही. मात्र सार्वजनिक जीवनात काम करत असताना सर्वच लोकांनी जबाबदारीनं वक्तव्य करणे गरजेचं आहे. कारण कायदा हा सर्व व्यक्तींसाठी समान असतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Updated : 16 Feb 2020 11:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top