Home > News Update > भोसरी- आळंदी चौकातील विद्युत रोहीत्राची दुरूस्ती करण्याची मागणी

भोसरी- आळंदी चौकातील विद्युत रोहीत्राची दुरूस्ती करण्याची मागणी

भोसरी- आळंदी चौकातील विद्युत रोहीत्राची दुरूस्ती करण्याची मागणी
X

पिंपरी चिंचवड : भोसरी- आळंदी रस्ता चौकातील कै. अंकुशराव लांडगे मिनी मार्केटजवळील विद्युत रोहित्राचा शॉक लागून एक मजूर ४० टक्के भाजल्यामुळे जखमी झाला आहे. संबंधित मजुरास पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करावे लागले, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे संबंधित रोहित्राची तात्काळ दुरूस्ती करावी आणि सुरक्षेबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नगरसेवक सागर गवळी यांनी केली आहे.

याबाबत महावितरण भोसरी विभागाचे कार्यकारी अधिकारी शिवाजी चव्हाण यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, संबंधित रोहित्राजवळ अनेक टपऱ्या आहेत. काही टपऱ्या अनधिकृत असल्याचे सांगितले जाते. काही टपऱ्या रोहित्राला खेटून आहेत. त्यामुळे भविष्यात आणखी असा अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच, रोहित्राला चिकटूनच महापालिकेची राजा छत्रपती शिवाजी महाराज शाळेची सीमाभिंत आहे. त्यामुळे याठिकाणी भविष्यात अपघात झाल्यास विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका होवू शकतो. त्यामुळे महावितरण प्रशासनाने संबंधित रोहित्राची तात्काळ दुरुस्ती करुन घ्यावी. तसेच, सुरक्षेबाबत सर्वतोपरी उपाययोजना करावी, अशी मागणी नगरसेवक गवळी यांनी केली आहे.

Updated : 14 Sep 2021 12:29 PM GMT
Next Story
Share it
Top