Home > News Update > पालघर आणि ठाणे जिल्ह्यात "चेस द व्हायरस" मोहीम कधी?

पालघर आणि ठाणे जिल्ह्यात "चेस द व्हायरस" मोहीम कधी?

Demand for chase the virus mission in thane and palghar districts – मुंबईत कोरोना आटोक्यात येत असला तरी मुंबईला लागून असलेल्या ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये काही उपाययोजना का केल्या जात नाहीयेत असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

पालघर आणि ठाणे जिल्ह्यात चेस द व्हायरस मोहीम कधी?
X

मुंबईला लागून असलेल्या पालघर आणि ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तो नियंत्रणात आणण्यासाठी सरकारी यंत्रणा प्रयत्न करत आहेत. मुंबई शहरात महानगरपालिकेने केलेल्या प्रभावी उपाययोजनेमुळे तो आटोक्यात येऊ शकला. मग पालघर/ठाणे जिल्हा प्रशासन आणि ठाणे/वसई-विरार महानगरपालिका प्रशासनाला ते का शक्य होऊ शकत नाही, असा सावल आता विचारला जाऊ लागला आहे.

मुंबई शहरामध्ये महानगरपालिकेने "चेस द व्हायरस" अशी महत्वाकांक्षी योजना राबवल्यामुळे प्रादुर्भाव नियंत्रणात येत आहे. या मोहिमेच्या यशानंतर राज्याच्या आरोग्य विभागाने ती प्रत्येक जिल्ह्यात राबवणे गरजेचे होते. चार महिन्यांपूर्वी मुंबईतील धारावी परिसर हा अत्यंत धोकादायक झाला होता. या परिसरात दिवसागणिक शेकडो रुग्ण सापडत होते. मनपा प्रशासनाकडून विविध स्तरावर उपाययोजना करण्यात येत होत्या, पण त्या यशस्वी ठरत नव्हत्या.

अखेर शासनाने सनदी अधिकारी इकबालसिंह चहल यांच्याकडे मनपा आयुक्तपदाची सूत्रे सोपवली. चहल यांनी आल्या आल्या "चेस द व्हायरस" ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेंतर्गत धारावी वसाहतीमधील प्रत्येक घरातील व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे अनेक रुग्णांवर वेळीच उपचार झाले व आजार नियंत्रणात येऊ शकला.

हे ही वीचा..

#Lockdown मुळे अभ्यासक्रमातील काही पाठ कायमस्वरुपी वगळले का?

मुंबईचं ‘स्पिरीट’ ! कोरोना बाद ?

राज्यात एका दिवसात 10 हजारांच्यावर रुग्ण कोरोनामुक्त

सध्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषदांसह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढतोय. ठाणे आणि नवी मुंबई परिसरात परिस्थिती धोकादायक बनली आहे. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर " चेस द व्हायरस" ही मोहीम राबवण्याची मागणी वाढू लागली आहे. यासंदर्भात वसई-विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांनी सांगितले की, “ गेल्या काही दिवसात मनपा हद्दीत जे हॉटस्पॉट आहेत. त्या भागातील नागरिकांची तपासणी केली. तसेच विविध स्तरावर आपण उपाययोजना करत आहोत. त्यामुळे गेल्या चार दिवसात रुग्णाची संख्या नियंत्रणात आली आहे. तसेच यापुढेही आपण योग्य ते नियोजन करणार आहोत.

“गेल्या महिन्यात कॊरोनासंदर्भात झालेल्या बैठकीत आम्ही प्रशासनासमोर घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. मनपा क्षेत्रातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता "चेस द व्हायरस" च्या धर्तीवर मोहीम राबवणे,गरजेचे आहे.” अशी माहिती वसई – विरारचे महापौर प्रवीण शेट्टी यांनी दिलीये.

Updated : 29 July 2020 1:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top