Delhi Assembly Election 2020 Result Live : ‘आप’ ची मुसंडी, अरविंद केजरीवाल यांचा करिश्मा कायम

Courtesy : Social Media

संपुर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती यायला आता सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत आलेल्या निकालाच्या कलानुसार आम आदमी पक्षाने पन्नास पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. मात्र, या निवडणूकीत मागच्या पेक्षा कमी जागा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रोटी, कपडा, मकान आणि धर्म या मुद्द्यावर झालेल्या निवडणुकीत लोकांनी रोटी, कपडा, मकान अर्थात मुलभूत सुविधांचा विचार करुन आपले मतदान केल्याचं दिसून येत आहे. तसंच  CAA,NRC च्या विरोधाचा निवडणुकीवर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे.

आप – 51

भाजप -19

काँग्रेस – 00