Home > News Update > रुग्णवाहिका मिळाली नाही, मृतदेह टॅक्सीच्या टपावर ठेवून स्मशानभूमीत!

रुग्णवाहिका मिळाली नाही, मृतदेह टॅक्सीच्या टपावर ठेवून स्मशानभूमीत!

रुग्णवाहिका मिळाली नाही, मृतदेह टॅक्सीच्या टपावर ठेवून स्मशानभूमीत!
X

राज्यात कोरोनाची भीषण स्थिती दिसून येत आहे. दररोज कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात कोरोना मुळं शेकडो लोकांचा बळी जात आहे. अशा परिस्थितीत सर्व सामान्य लोकांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. राज्यात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले असल्याचं एका संतापजनक फोटो ने समोर आलं आहे.

नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर येथे राहणाऱ्या हवालदार सिंह यांच्या पत्नीचं निधन झाल्यानंतर रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह टॅक्सीच्या टपावर ठेवून स्मशानभूमीत नेण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवार 20 जून ला घडली.

या संदर्भात सिंह यांच्या मुलाने माध्यमाला प्रतिक्रिया दिली. मृतदेह नेण्यासाठी सरकारी रुग्णवाहिकेला फोन केला, तर तेव्हा रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती तर दुसरीकडे खाजगी रुग्णवाहिका अवघ्या 2 किलोमीटर जाण्यासाठी 2000 ते 3000 रुपये मागत होती. त्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला.

लॉकडाऊन च्या काळात दवाखाने मोठ्या प्रमाणात बील लावत आहेत. त्यातच दवाखान्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करुनही नातेवाईकांचा मृत्यू झाल्यास काय करायचं? असा सवाल उपस्थित होतो. दवाखान्याच्या खर्चाने अडचणीत सापडलेल्या नातेवाईकांना जर अशा प्रकारे रुग्ण गेल्यानंतर रुग्णवाहिका मिळाली नाही तर त्यांनी काय करावं. असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.

Updated : 26 Jun 2020 2:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top