‘निसर्ग’ चक्रीवादळ धडकलं, महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये 43 NDRF टीम तैनात

24

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेलं ‘निसर्ग’ चक्रीवादळ आता ठाणे आणि मुंबईत येऊन धडकलं आहे. आज दुपारी 1 वाजता हे वादळ अलिबागच्या किनाऱ्यावर येऊन धडकलं आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून देशात साधारण 43 NDRF ची पथक तैनात करण्यात आली आहेत. यातील 21 महाराष्ट्रात तैनात करण्यात आली आहेत. तर 16 गुजरात मध्ये तैनात करण्यात आली आहेत. 1 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या संदर्भात NDRF चे अधिकारी एस. एन. प्रधान यांनी माध्यमांना या संदर्भात माहिती दिली.

Comments