‘निसर्ग’ चक्रीवादळ धडकलं, पुढचे काही तास चिंतेचे

17

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेलं ‘निसर्ग’ चक्रीवादळाने आता आपलं रुप दाखवायला सुरुवात केली आहे. आज दुपारी 1 वाजता हे वादळ अलिबागच्या किनाऱ्यावर येऊन धडकलं आहे.

या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे. मात्र, या वादळाचा सर्वात मोठा धोका समुद्र किनारी असणाऱ्या शहरांना, गावांना असल्यामुळं शासनानं खबरदारी म्हणून या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

रायगड, रत्नागिरी, सारख्या कोकण किनारी असणाऱ्या जिल्ह्यामध्ये कलम 144 कर्फ्यू लागू करण्यात आलं आहे. अनेक ठिकाणची वीज बंद करण्यात आली आहे.

मुंबईत प्रशासनाने रेड अलर्ट देऊन किनारपट्टी भागात संचारबंदी जारी केली आहे. मुंबई चे पालिका आयुक्त इक्बाल चहल आणि अग्निशमन दलाचे प्रमुखांनी दादर आणि गिरगाव चौपाटीची पहाणी केली.

विशेष म्हणजे खबरदारीचा उपाय म्हणून वांद्रे-वरळी सी लिंक बंद करण्यात आला आहे. वाहनं पुन्हा माघारी फिरत आहेत.

 

Comments