दिलासादायक – 24 तासात 600 रुग्ण कोरोनामुक्त

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता एक दिलासादायक बाब समोर आली आहे. गेल्या २४ तासात ६०० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने आता एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८ हजार ३३२ झाली आहे. तर गेल्या २४ तासात कोरोनाचे १ हजार ८२३ नवे रुग्ण आढळल्याने कोरोनाची एकूण रुग्ण संख्या आता ३३ हजार ६१० वर पोहोचली आहे.

हे वाचलंत का?


Corona Virus: राज्यात 10 हजार रुग्णांचा टप्पा पार, 459 रुग्णांचा बळी
कोरोना लोकशाहीवरील हल्ला – कुमार केतकर
CoronaVirus: महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 10 हजारांच्याजवळ, 432 रुग्णांचा मृत्यू…
तर २४ तासात ६७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने आता एकूण कोरोना बळींचा आकडा १०७५ वर पोहोचला आहे. आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाच्या दुप्पट रुग्णवाढीचा कालावधी आता ११ दिवसांवर गेला आहे. सुरूवातील ३ दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट होत होती.
केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार १४ दिवसांपूर्वी रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण १३.५ टक्के होते ते प्रमाण वाढून आता २५.१९ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर दुसरीकडे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अवघे ३.२ टक्के आहे, असंही अग्रवाल यांनी सांगितले.
हे ही वाचा…

विरोधी पक्ष आणि रडीचा डाव
Exclusive: लाँकडाऊन च्या काळातील महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार मेळावा पाहा मॅक्समहाराष्ट्रवर
उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीचा पुढील 24 तासात होणार फैसला!