देशातील कोरोनाबाधीतांची संख्या ३० हजारांच्या उंबरठ्यावर

Courtesy: Social Media

गेल्या २४ तासात देशभरात कोरोनाचे १ हजार ५९४ नवीन रुग्ण आढळल्याने आता कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या २९ हजार ९७४वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात ५१ रुग्णांचा मृत्यू झाल्याने आता कोरोना बळींची संख्या ९३७वर पोहोचली आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७ हजार २६वर पोहोचली आहे. त्यामुळे आता देशभरात कोरोनाच्या २२ हजार १० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान रुग्णांच्या बरे होण्याची प्रमाण वाढून आता २३ टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान देशातील १७ जिल्ह्यांमध्ये गेल्या २८ दिवसात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. दरम्यान देशभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून ही संख्या आता ८ हजार ५९०वर पोहोचली आहे. तर गुजरातमधील कोरोना रुग्णांची संख्या ३५४८, दिल्ली- ३१०८, म. प्रदेश – २३६८, राजस्थान – २१८५, उ. प्रदेश – २०४३ अशी आहे.