कोणताही उपचार न घेता कोव्हिड रुग्णाचा अहवाल 5 तासात निगेटिव्ह

279

एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला तर काय होते? हे आता बऱ्याच लोकांनी अनुभवलं आहे. घरातच काय गल्लीत, गावात एक जरी पेशन्ट आढळला तरी काय होते? हे आपल्याला चांगलचं माहित आहे. एक रुग्ण गावात आढळला तरी पूर्ण गाव लॉक केला जातो. मात्र, रुग्ण निगेटीव्ह आहे. आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर? अशी काहीशी घटना सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात बिळाशी या गावात घडली आहे.

लक्ष्मीबाई बापूराव शिंदे वय ६२ असं महिलेचं नाव असून किरकोळ अंगदुखी, दाढ दुखी होती. म्हणून जवळील खासगी दवाख्यान्यात उपचार घेण्यासाठी नेले. मात्र, कोविड टेस्ट बंधनकारक असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आजींना कोकरूड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आले. दिनांक 6 ऑगस्ट या ठिकाणी त्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी स्वॅब घेण्यात आला.

दरम्यानच्या काळात अंगदुखी व तापाचं प्रमाण वाढल्यानं भारती हॉस्पीटल मिरज या ठिकाणी आजींना दाखल करण्यात आलं आसता या ठिकाणीही आजींचा स्वॉब घेण्यात आला.

मात्र, दि. ६ तारखेला सकाळी आकरा वाजता कोकरूड प्राथमिक आरोग्य केंद्राने घेतलेल्या स्वॉब चा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. आणि त्याचं दिवशी दि .६ रोजी दुपारी साधारणतः साडेपाच वाजता भारती हॉस्पीटने घेतलेल्या स्वॉब चा रिपोर्ट निगेटिव्ह आला.

त्यामुळे चार पाच तासात पेशेन्टवर कोणताही कोविड उपचार न करता रिपोर्ट निगेटिव्ह कसा आला अशी शंका निर्माण झाली आहे.

या निमित्ताने उपस्थित होणारे प्रश्न?

लॅबोरेटरी किंवा टेस्ट घेण्यामध्ये चूक झाली आहे का?

पेशेन्टच्या घरची व समाजामध्ये मोठे भितीचे वातावरणं पसरते. त्याला जबाबदार कोण?

कोव्हिडचा उपचार सुरू केला असता, या वयस्कर व्यक्तीला हानी झाली असती त्याची जबाबदारी कोणाची? याचीही चौकशी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Comments