Home > News Update > धनंजय मुंडेंच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना टेस्ट, लोकप्रतिनिधींचा समावेश

धनंजय मुंडेंच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना टेस्ट, लोकप्रतिनिधींचा समावेश

धनंजय मुंडेंच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना टेस्ट, लोकप्रतिनिधींचा समावेश
X

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्यानंतर त्यांना मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मुंडे आणि त्यांच्या स्वीय सहायकासह पाच जणांचा यात समावेश आहे.

धनंजय मुंडे, त्यांचे दोन स्वीय सहायक, मुंबई आणि बीडमधील वाहनचालक तसेच मुंबईतील कूक यांचे स्वॅब पॉझिटीव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातही खळबळ उडालीय. मुंडे पालकमंत्री असल्याने त्यांच्या संपर्कात अनेकजण आलेले आहेत. त्यात जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींचा देखील समावेश आहे.

हे ही वाचा..

अँब्युलन्स चालकाचा आगळा वेगळा वाढदिवस

बापरे बाप!

जातीव्यवस्था : मजबूत होतीय की खिळखिळी? प्रा. हरी नरके

आरोग्य विभागाने त्यांचे स्वॅब घेण्यास सुरवात केलीय. दरम्यान धनंजय मुंडे यांनी 8 जून रोजी अंबाजोगाईत कोरोना विषाणू निदान प्रयोगशाळेचे उद्घघाटन केले होते. त्यामुळे प्रशासन देखील हादरून गेलं आहे. जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी मागील चार दिवसात जे व्यक्ती पालकमंत्री त्यांचे स्वीय सहायक किंवा त्यांच्या निकटवर्तीयांच्या संपर्कात आले असतील त्यांनी स्वतःहून चाचणीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

Updated : 13 Jun 2020 1:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top