Covid19: खान्देशाने वाढवली महाराष्ट्राची चिंता, काय आहे स्थिती ?

जळगाव

जळगाव, धुळे आणि नंदुरबार या ३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. जळगाव जिल्ह्यात मंगळवारी आणखी 9 रूग्ण कोरोनाबाधीत आढळल्याने आता कोरोना रुग्णांची संख्या 31 वर पोहचली आहे. जळगाव जिल्ह्यातील एकट्या अमळनेरमध्ये 17 रुग्ण आढळल्याने हा भाग आता हॉटस्पॉट ठरला आहे. अमळनेरसह पाचोरा तसंच भुसावळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. हे सर्व रूग्ण यापूर्वी आढळून आलेल्या कोरोनाबाधीत रूग्णाच्या संपर्कात आले होते.

धुळे

धुळे जिल्ह्यात हिरे शासकीय रुग्णालयात 24 रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र मंगळवारी पहाटे कोरोनाचे सात संशयित रुग्ण हॉस्पिटलमधून पळून गेल्याने खळबळ उडाली आहे. पळून गेलेल्या या सात रुग्णांचे अहवाल अजून आलेले नाही.

नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यात मंगळवारी आणखी चार रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता 15 वर पोहचली आहे. शहादा इथं ४४ वर्षे, ४८ वर्षे आणि ६५ वर्षांच्या ३ पुरुषांचे आणि एका १२ वर्षाच्या मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्व रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. आधीच्या पॉझिटिव्ह रुग्णाने उशिरा वैद्यकीय तपासणी केल्याने इथे कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.

खान्देशातील कोरोनाबाधीतांची संख्या – 70
जळगाव – 31
धुळे – 24
नंदुरबार – 15