देशातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ३५ हजारांवर

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासात १ हजार ९९३ नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्ण संख्या आता ३५ हजार ४३ वर पोहोचली आहे. तर २४ तासात ७३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने आता एकूण कोरोना बळींचा आकडा १ हजार १४७ वर पोहोचला आहे.
पण दिलासादायक बाब म्हणजे एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८ हजार ८८९ झाली आहे. आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाच्या दुप्पट रुग्णवाढीचा कालावधी आता ११ दिवसांवर गेला आहे. सुरूवातील ३ दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट होत होती.

हे ही वाचा…


मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या खरंच 75 हजारांवर जाणार का?

संयुक्त महाराष्ट्राचा लढा ज्या ताकदीनं लढलो त्याच ताकदीने ‘कोरोना’विरुद्ध लढू: अजित पवार

कोरोनाचा विषाणू चीनच्या प्रयोगशाळेतच बनल्याचा पुरावा – डोनाल्ड ट्रम्प

केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार १४ दिवसांपूर्वी रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण १३.५ टक्के होते ते प्रमाण वाढून आता २५.१९ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर दुसरीकडे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अवघे ३.२ टक्के आहे, असंही अग्रवाल यांनी सांगितले.