Top
Home > News Update > भारतात गेल्या २४ तासात कोरोनाबाधीतांचा आकडा आणखी वाढला

भारतात गेल्या २४ तासात कोरोनाबाधीतांचा आकडा आणखी वाढला

भारतात गेल्या २४ तासात कोरोनाबाधीतांचा आकडा आणखी वाढला
X

कोरोनाबाधीतांची देशातील संख्या १३६१ वर पोहोचली असून त्यापैकी १२३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १२३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ३५ झाली आहे. दरम्यान गेल्या २४ तासात कोरोनाबाधीत २२७ नवीन रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी मंगळवारी दिली.

लोकांचा असहकार आणि चाचण्यांना होत असलेला उशीर यामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याचं अग्रवाल यांनी सांगितले. पण अजूनही समूह संसर्ग झाला नसल्याचा दावा सरकार करतंय. दरम्यान आता सरकारनं रोजचे वाढते रुग्ण पाहता कोरोनाची कोणकोणती संभाव्य केंद्र आहेत याचा शोध सुरू केला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू,मध्य प्रदेश आणि गुजरातसह इतर राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे ३०२ रुग्ण आढळले आहेत तर १० जणांचा मृत्यू झाला आहे.

Updated : 1 April 2020 9:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top