कोरोनाचा गुणाकार सुरु: एकाच दिवसात महाराष्ट्रात 552 नवीन रुग्णांची नोंद…

coronavirus in India, coronavirus in india update,coronavirus in Italy, coronavirus in tamil nadu, coronavirus in india death ,Coronavirus, Corona, Mask, corona vaccine update, corona means, corona in Noida, corona vaccine usa, corona meaning English, corona meaning in tamil, कोरोना वायरस का गाना, कोरोनावायरस सॉन्ग, corona virus in Noida, कोरोनाव्हायरस व्हिडीओ, कोरोना खबर, कोरोना वायरस सॉन्ग, कोरोनावायरस के बारे में बताओ, कोरोना वायरस बद्दल माहिती, कोरोना वायरस कैसा होता है, कोरोना वायरस कब खत्म होगा, कोरोना वायरस की दुआ, कोरोना वायरस गाणे, कोरोना वायरस अपडेट,महाराष्ट्र एकूण रूग्ण, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, नागपूर, कल्य़ाण डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे, यवतमाळ, अहमदनगर, पनवेल, सातारा, उल्हासनगर, वसई विरार, पालघऱ, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, रत्नागिरी, कोल्हापूर, गोंदिया,coronavirus Live Updates, Global Death, India Death Update, lockdown, migration in India, Italy Death Update, united states Corona virus Update, USA death Update, toll India, new cases, new cases in Maharashtra

गेल्या 24 तासात कोरोनाबाधीत ५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ५२१८ झाली आहे. १५० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७२२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४२४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५२१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ७,८०८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

गेल्या 24 तासात १९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २५१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील १२, पुण्यातील ३, ठाणे मनपामधील २ तर सांगली येथील १ आणि पिंपरी चिंचवड येथील १ रुग्ण आहे.

गेल्या 24 तासात झालेल्या मृत्यूंपैकी १० पुरुष तर ९ महिला आहेत. त्यात ६० वर्षे किंवा त्यावरील ९ रुग्ण आहेत तर ९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर १ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १९ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये ( ६३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ३४५१ (१५१)
ठाणे: २२ (२)
ठाणे मनपा: १५० (४)
नवी मुंबई मनपा: ९४ (३)
कल्याण डोंबिवली मनपा: ९३ (२)
उल्हासनगर मनपा: १
भिवंडी निजामपूर मनपा: ६
मीरा भाईंदर मनपा: ८१ (२)
पालघर: १८ (१)
वसई विरार मनपा: १११ (३)
रायगड: १६
पनवेल मनपा: ३४ (१)
ठाणे मंडळ एकूण: ४०७७ (१६९)
नाशिक: ४
नाशिक मनपा: ६
मालेगाव मनपा: ८५ (८)
अहमदनगर: २१ (२)
अहमदनगर मनपा: ८
धुळे: २ (१)
धुळे मनपा: २
जळगाव: १
जळगाव मनपा: २ (१)
नंदूरबार: ४
नाशिक मंडळ एकूण: १३५ (१२)
पुणे: १९ (१)
पुणे मनपा: ६४६ (५२)
पिंपरी चिंचवड मनपा: ५१ (२)
सोलापूर: ०
सोलापूर मनपा: २५ (२)
सातारा: १३ (२)
पुणे मंडळ एकूण: ७५४ (५९)
कोल्हापूर: ६
कोल्हापूर मनपा: ३
सांगली: २६
सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)
सिंधुदुर्ग: १
रत्नागिरी: ८ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ४५ (२)
औरंगाबाद:१
औरंगाबाद मनपा: ३४ (३)
जालना: १
हिंगोली: १
परभणी: ०
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ३८ (३)
लातूर: ८
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: ०
लातूर मंडळ एकूण: १२
अकोला: ७ (१)
अकोला मनपा: ९
अमरावती: ०
अमरावती मनपा: ६ (१)
यवतमाळ: १६
बुलढाणा: २१ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: ६० (३)
नागपूर: ३
नागपूर मनपा: ७६ (१)
वर्धा: ०
भंडारा: ०
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: २
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: ८२ (१)
इतर राज्ये: १५ (२)
एकूण: ५२१८ (२५१)

( या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा / मनपांनी उपलब्ध करुन दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात संसर्गग्रस्त झालेले आहेत. आज मुंबई मनपा क्षेत्रात प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या १७ एप्रिलपासूनच्या अहवालातील रुग्णांचा समावेश करण्यात आलेला आहे.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ४३२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ६६११ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २६.८९ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

देशात काय स्थिती?

देशभरात कोरोना प्रसार वाढतोय. मंगळवारी देशातील कोरोनाबळींच्या संख्येने ६००चा टप्पा गाठला. गेल्या २४ तासात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १ हजार ३२९ ने वाढली आहे. त्यामुळे आता देशातील एकूण रुग्णांचा आकडा १९ हजारांच्या अगदी जवळ येऊन ठेपला आहे. तर २४ तासात ४४ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याने आता एकूण कोरोनाबळींची संख्या ६०३ झाली आहे. दरम्यान १८ हजार ९८५ रुग्णांपैकी ३ हजार २५९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सोडून देण्यात आले आहे. दरम्यान कोरोना बाधीत रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. सध्या हे प्रमाण एकूण रुग्ण संख्येच्या प्रमाणात १७.४८ टक्के आहे. दरम्यान देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असून ही संख्या ५ हजारांच्यावर गेली आहे. त्यानंचर दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू या राज्यांमध्ये रुग्णसंख्या आढळली आहे.

जगात काय स्थिती?
सध्या जगामध्ये कोरोना व्हायरस च्या रुग्णांची संख्या 24 लाख 2 हजार 250 वर गेली आहे. तर गेल्या 24 तासात 72 हजार 397 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत कोरोना व्हायरसने जगात 1 लाख 63 हजार 97 लोकांचा बळी घेतला आहेत.