Covid -19 :  राज्यातील रुग्णांची ३३५ वर, १६ रुग्णांचा मृत्यू

coronavirus in India, coronavirus in india update,coronavirus in Italy, coronavirus in tamil nadu, coronavirus in india death ,Coronavirus, Corona, Mask, corona vaccine update, corona means, corona in Noida, corona vaccine usa, corona meaning English, corona meaning in tamil, कोरोना वायरस का गाना, कोरोनावायरस सॉन्ग, corona virus in Noida, कोरोनाव्हायरस व्हिडीओ, कोरोना खबर, कोरोना वायरस सॉन्ग, कोरोनावायरस के बारे में बताओ, कोरोना वायरस बद्दल माहिती, कोरोना वायरस कैसा होता है, कोरोना वायरस कब खत्म होगा, कोरोना वायरस की दुआ, कोरोना वायरस गाणे, कोरोना वायरस अपडेट,महाराष्ट्र एकूण रूग्ण, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, नागपूर, कल्य़ाण डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे, यवतमाळ, अहमदनगर, पनवेल, सातारा, उल्हासनगर, वसई विरार, पालघऱ, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, रत्नागिरी, कोल्हापूर, गोंदिया,coronavirus Live Updates, Global Death, India Death Update, lockdown, migration in India, Italy Death Update, united states Corona virus Update, USA death Update, toll India, new cases, new cases in Maharashtra

राज्यात गेल्या २४ तासात कोरोना बाधित ३३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ३०  रुग्ण मुंबईचे, पुणे येथील २ तर बुलढाण्याच्या एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ३३५ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

गेल्या २४ तासात राज्यात करोना मुळे ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील दोन मृत्यू मुंबईत झाले असून त्यापैकी एक ७५ वर्षीय पुरुष आहे तर दुसरा ५१ वर्षीय पुरुष आहे. याशिवाय ५० वर्षीय पुरुषाचा मृत्यू पालघर येथे झाला आहे. या तिन्ही रुग्णांनी कोठेही परदेशी प्रवास केल्याचा इतिहास नाही.  आतापर्यंत  राज्यात करोनामुळे एकूण १६ मृत्यू झाले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझीटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील :

मुंबई                                  १८१

पुणे ( शहर व ग्रामीण भाग ) ५०

सांगली                              २५

मुंबई वगळून ठाणे मंडळातील मनपा       ३६

नागपूर                                १६

यवतमाळ                                 ४

अहमदनगर                        ८

बुलढाणा                                            ४

सातारा, कोल्हापूर प्रत्येकी   २

औरंगाबाद, रत्नागिरी,  सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक प्रत्येकी        १

इतर राज्य – गुजरात     १

एकूण  ३३५ त्यापैकी  ४१ जणांना घरी सोडले तर  १३ जणांचा मृत्यू 

राज्यात आज एकूण ७०५ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत.  आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७१२६ नमुन्यांपैकी ६४५६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर ३३५ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

आतापर्यंत ४१ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात २४ हजार ८१८  व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १८२८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

जगात काय आहे स्थिती?

जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरस चा सर्वाधिक फटका जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला बसलाय. अमेरिकेत कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या बुधवारी 2 लाख 3 हजार 608 वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या 4 हजार 447वर पोहोचली आहे. चीनमधून कोरोनाचा उद्रेक झाला असला तरी चीनपेक्षा इतर देशांना या कोरोनाचा मोठा फटका बसला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार जगभरात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 8 लाख 27 हजार 419 वर पोहोचली आहे, तर मृतांची संख्या 40 हजार 777 झाली आहे, आता 205 देशांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढल्याने आता रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत आता या देशांच्या यादीत ३५व्या क्रमांकावर आला आहे.