भारत चीन युद्ध होणार? चीनचा लष्कराला तयार राहण्याचा इशारा

Could the China-India border dispute trigger a military conflict?
Courtesy : Social Media

भारत आणि चीन दरम्यान असलेल्या बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात तणाव पाहायला मिळत आहे. चीन च्या राष्ट्रध्यक्षांनी लष्कराला तयार राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळं दिल्लीतही हालचाली वाढल्या असल्याचं पाहायला मिळत आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चिनी लष्कराला सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी तयार राहण्याचा इशारा दिला आहे. भारत चीन सीमेवरचा तणाव वाढला आहे. चीन च्या या इशाऱ्यानंतर दिल्लीमधील हालचाली वाढल्या आहेत. #NSA अजित डोवाल आणि #CDS बिपिन रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संदर्भात BRIEFING केलं आहे.

दोनही देशाच्या सीमेवरील तणाव वाढला आहे. भारत चीन सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने अचानक भारतातील सर्व चीनी विद्यार्थी, प्रवासी, उद्योगपतींना भारतातून परत बोलवण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी चीनने विशेष विमानाचे आयोजन केले आहे. हे कशाचे सूचक आहे? चीन नेमकी कसली तयारी करतो आहे? भारताने सावध राहणे गरजेचे आहे का? चीन सीमेवर एवढा आक्रमक का झाला आहे? चीनला भारताविषयी एवढा राग का ? पाहा परराष्ट्र धोरण विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांचे विश्लेषण