Home > News Update > डेड बॉडी बॅगमध्ये भ्रष्टाचार: विरोधकांचा आरोप

डेड बॉडी बॅगमध्ये भ्रष्टाचार: विरोधकांचा आरोप

डेड बॉडी बॅगमध्ये भ्रष्टाचार: विरोधकांचा आरोप
X

मुंबई महानगरपालिकेकडून कोरोनाच्या परिस्थितीत मास्क, पीपीई किट तसेच डेड बॉडी बॅग यासारख्या वस्तू खरेदी केल्या आहेत. या खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप ने केला आहे. या संदर्भात आपण पालिका आयुक्तांना पत्र देऊनही लक्ष दिले जात नसल्याने भाजपाच्यावतीने महापौर कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी या भ्रष्टाचाराची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

यावेळी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना शिंदे यांनी परेल येथील हाफकीन इन्स्टिट्यूटे 4.75 रुपयाला मास्क खरेदी करते. तेच मास्क पालिका 11.85 रुपयांना का खरेदी करते? कोरोनाचे डेड बॉडी बॅग मार्केटमध्ये 500 ते 800 रुपयांना मिळतात. त्याच बॅग पालिका 6700 रुपयांना खरेदी करते. या बॅगसाठी 10 निविदाकर आल्या होत्या.

त्यापैकी 9 जण बाद झाले. ज्याच्यावर राजकीय वरदहस्त होता. त्याला हे बॅग पुरवठ्याचे काम देण्यात आले. याबाबत पालिका आयुक्तांना पत्र दिले. मात्र, त्यांनी उत्तर दिलेले नाही. यामुळे आम्हाला हे आंदोलन करावे लागत आहे. या खरेदी मागे कोण अधिकारी आहेत त्यांची चौकशी करावी अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

सभा, गट नेता सभा गेल्या 3 महिन्यात घेण्यात आलेल्या नाहीत. सभा घेतल्यास भाजपा हे घोटाळे बाहेर काढेल. या भीतीने सभा घेतल्या जात नसल्याचा आरोप प्रभाकर शिंदे यांनी यावेळी केला. पालिकेच्या सभा घेतल्या जात नसल्याने लोकशाहीची मुस्कटदाबी सुरू असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे. पालिकेत मेलेल्या मृत्यूच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम सुरू आहे. भ्रष्टाचार लपवण्यासाठीच सभा घेतल्या जात नाही असा आरोप शिंदे यांनी केला आहे.

Updated : 18 Jun 2020 11:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top