करोना व्हायरस : स्पेनच्या राजकुमारीचा मृत्यू राजघराण्यातील पहिला बळी

PARIS, FRANCE - OCTOBER 05: Queen Letizia of Spain arrives at the Grand Palais to visit the Miro exhibition on October 05,2018 in Paris, France. The Spanish royal couple is in Paris to visit the "Miro, La couleur des reves" exhibition and participate in an official dinner with Emmanuel Macron and his wife Brigitte at the Elysee Presidential Palace. (Photo by Chesnot/WireImage)

कोरोना व्हायरस मुळे जगात 5 लाख 75 हजार 444 लोक बाधीत झाले आहेत. तर 26 हजार 654 लोकांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसने बॉलिवूड, हॉलिवूड, क्रीडा, राजकीय यासारख्या क्षेत्रातील लोकांना लागण झाली आहे. विशेष बाब म्हणजे या व्हायरस ने राजाला देखील सोडलं नाही.

इग्लंडचा राजघराण्यातील लोकांना देखील कोरोनाची लागण झाली. कोरोना व्हायरस मुळे युरोप खंडातील जवळ जवळ सर्व देश गेल्या 15 दिवसांपासून पूर्णपणे बंद आहेत. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्पेनची राजकुमारी मारिया टेरेसा यांचे करोना व्हायरसमुळे निधन झाले आहे.

मारिया स्पेनचे राजा फेलिपे सहावे यांची बहिण होत्या. मारिया यांचे भाऊ राजकुमार सिक्टो एनरिक डी बोरबोन यांनी फेसबुकवरून निधनाची माहिती दिली. मारिया यांचं वय 86 वर्ष होतं. करोनामुळे राजघराण्यातील व्यक्तीचे निधन होण्याची जगातील पहिलीच घटना आहे.