Coronavirus: राज्यात 3 हजार रुग्णाचा आकडा पार, 194 रुग्णांचा मृत्यू

coronavirus in India, coronavirus in india update,coronavirus in Italy, coronavirus in tamil nadu, coronavirus in india death ,Coronavirus, Corona, Mask, corona vaccine update, corona means, corona in Noida, corona vaccine usa, corona meaning English, corona meaning in tamil, कोरोना वायरस का गाना, कोरोनावायरस सॉन्ग, corona virus in Noida, कोरोनाव्हायरस व्हिडीओ, कोरोना खबर, कोरोना वायरस सॉन्ग, कोरोनावायरस के बारे में बताओ, कोरोना वायरस बद्दल माहिती, कोरोना वायरस कैसा होता है, कोरोना वायरस कब खत्म होगा, कोरोना वायरस की दुआ, कोरोना वायरस गाणे, कोरोना वायरस अपडेट,महाराष्ट्र एकूण रूग्ण, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, नागपूर, कल्य़ाण डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे, यवतमाळ, अहमदनगर, पनवेल, सातारा, उल्हासनगर, वसई विरार, पालघऱ, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, रत्नागिरी, कोल्हापूर, गोंदिया,coronavirus Live Updates, Global Death, India Death Update, lockdown, migration in India, Italy Death Update, united states Corona virus Update, USA death Update, toll India, new cases, new cases in Maharashtra

आज राज्यात कोरोनाबाधीत २८६ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ३२०२ झाली आहे. आज दिवसभरात ५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३०० रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५६ हजार ६७३ नमुन्यांपैकी ५२ हजार ७६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर ३२०२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७१,०७६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६१०८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे ३, पुण्यातील ४ आहेत. त्यापैकी ५ पुरुष तर २ महिला आहेत. आज झालेल्या ७ मृत्यूपैकी ४ जण हे ६० वर्षे किंवा त्यावरील आहेत ३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या ७ जणांपैकी ६ रुग्णांमध्ये ( ८६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १९४ झाली आहे.

महाराष्ट्र राज्यात कोरोना मुळे होणा-या मृत्यूचा दर हा देशातील इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. या मृत्यूंची कारणमीमांसा आणि उपाययोजना करण्यासाठी तसेच जिल्हा पातळीवर रुग्णोपचार करणा-या डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यस्तरावर तज्ञ डॉक्टरांचे विशेष दल ( टास्क फोर्स ) स्थापन करण्यात आले आहे. यामुळे राज्यात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी एक हॉटलाईन उपलब्ध होणार आहे.

या टास्क फोर्स मधील तज्ञ डॉक्टरांना सोमवार ते रविवार असे दिवस वाटप करण्यात आले असून या टास्क फोर्समध्ये शासकीय तसेच खाजगी आरोग्य क्षेत्रातील तज्ञांचा समावेश आहे. डॉ. झहीर उदवाडिया , डॉ. नितीन कर्णिक, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. केदार तोरस्कर, डॉ. ओम श्रीवास्तव , डॉ. शशांक जोशी आणि डॉ. राहुल पंडीत या तज्ञांचा या टास्क फोर्समध्ये समावेश आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: २०७३ (११७)
ठाणे: १३
ठाणे मनपा: १०९ (३)
नवी मुंबई मनपा: ६८ (३)
कल्याण डोंबवली मनपा: ५० (२)
उल्हासनगर मनपा: १
भिवंडी निजामपूर मनपा: १
मीरा भाईंदर मनपा: ५१ (२)
पालघर: ५ (१)
वसई विरार मनपा: ३४ (३)
रायगड: ६
पनवेल मनपा: १२ (१)
ठाणे मंडळ एकूण: २४२३ (१३२)
नाशिक: ३
नाशिक मनपा: ५
मालेगाव मनपा: ४० (२)
अहमदनगर: १९ (१)
अहमदनगर मनपा: ९
धुळे: १ (१)
धुळे मनपा: ०
जळगाव: ०
जळगाव मनपा: २ (१)
नंदूरबार: ०
नाशिक मंडळ एकूण: ७९ (५)
पुणे: १६
पुणे मनपा: ४१९ (४४)
पिंपरी चिंचवड मनपा: ३८ (१)
सोलापूर: ०
सोलापूर मनपा: १२ (१)
सातारा: ७ (२)
पुणे मंडळ एकूण: ४९२ (४८)
कोल्हापूर: ३
कोल्हापूर मनपा: ३
सांगली: २६
सांगली मिरज कुपवाड मनपा:०
सिंधुदुर्ग: १
रत्नागिरी: ६ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ३९ (१)
औरंगाबाद:०
औरंगाबाद मनपा: २८ (२)
जालना: २
हिंगोली: १
परभणी: ०
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ३२ (२)
लातूर: ८
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: ०
लातूर मंडळ एकूण: १२
अकोला: ७ (१)
अकोला मनपा: ७
अमरावती: ०
अमरावती मनपा: ५ (१)
यवतमाळ: १३
बुलढाणा: २१ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: ५४ (३)
नागपूर: १
नागपूर मनपा: ५५ (१)
वर्धा: ०
भंडारा: ०
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: ६० (१)
इतर राज्ये: ११ (२)
एकूण: ३२०२ (१९४)

(हा अहवाल १६ एप्रिल २०२० च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेला आहे.) राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या २९७ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ५६६४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २०.५० लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.