Coronavirus: दिलासादायक राज्यात 2,465 रुग्ण कोरोनामुक्त, रुग्णांची संख्या 14, 541 वर

Coronavirus Outbreak LIVE Updates: Maharashtra reports 771 new COVID-19 cases, 35 deaths today; total number of cases rises to 14,541 in state

आज राज्यात ७७१ नवीन रुग्णांची नोंद झाली. तसेच आजच्या आकडेवारीमध्ये मुंबई वगळता इतर जिल्हे / मनपा यांची आय सी एम आर यादीनुसार एकूण आकडेवारी अद्ययावत करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १४,५४१ झाली आहे.

  • आज ३५०  रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २४६५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
  • आज राज्यात ७७१ नवीन रुग्णांचे निदान
  • आज राज्यात ३५  करोना बाधित रुग्णांचा मृत्यू
  • राज्यातील एकूण रुग्ण – १४,५४१

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका ९३१० ३६१
ठाणे ६४
ठाणे मनपा ५१४
नवी मुंबई मनपा २५४
कल्याण डोंबवली मनपा २२८
उल्हासनगर मनपा
भिवंडी निजामपूर मनपा २२
मीरा भाईंदर मनपा १५२
पालघर ४६
१० वसई विरार मनपा १५८
११ रायगड ४१
१२ पनवेल मनपा ६४
ठाणे मंडळ एकूण १०८५७ ३९०
१३ नाशिक २१
१४ नाशिक मनपा ३१
१५ मालेगाव मनपा ३३० १२
१६ अहमदनगर ३५
१७ अहमदनगर मनपा
१८ धुळे
१९ धुळे मनपा २४
२० जळगाव ४६ ११
२१ जळगाव मनपा ११
२२ नंदूरबार १८
नाशिक मंडळ एकूण ५३१ ३०
२३ पुणे १०२
२४ पुणे मनपा १७९६ १०६
२५ पिंपरी चिंचवड मनपा १२०
२६ सोलापूर
२७ सोलापूर मनपा १२६
२८ सातारा ७९
पुणे मंडळ एकूण २२२६ १२२
२९ कोल्हापूर
३० कोल्हापूर मनपा
३१ सांगली ३२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा
३३ सिंधुदुर्ग
३४ रत्नागिरी १०
कोल्हापूर मंडळ एकूण ६०
३५ औरंगाबाद
३६ औरंगाबाद मनपा ३१० १०
३७ जालना
३८ हिंगोली ५२
३९ परभणी
४० परभणी मनपा
औरंगाबाद मंडळ एकूण ३७५ ११
४१ लातूर १९
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद
४४ बीड
४५ नांदेड
४६ नांदेड मनपा २८
लातूर मंडळ एकूण ५४
४७ अकोला
४८ अकोला मनपा ४८
४९ अमरावती
५० अमरावती मनपा ५७
५१ यवतमाळ ९१
५२ बुलढाणा २४
५३ वाशिम
अकोला मंडळ एकूण २२९ १७
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा १७२
५६ वर्धा
५७ भंडारा
५८ गोंदिया
५९ चंद्रपूर
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली
नागपूर एकूण १८०
इतर राज्ये २९
एकूण १४५४१ ५८३

 

( टीप – ही माहिती केंद्र सरकारच्या सूचनेनुसार,  कोविड१९ पोर्टलवरील प्रयोगशाळांनी  दिलेल्या कोविड १९ बाधित  रुग्णांच्या माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे.सदरील अहवाल आय सी एम आर टेस्ट आय डी ११३९५४पर्यंतचा आहे. राज्यातील बृहन्मुंबई मनपा आणि ठाणे , रायगड, व पालघर हे जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांबाबत आय सी एम आर प्रयोगशाळेच्या एकूण आकडेवारीत वाढ झालेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या अहवालात बदल होऊ शकतो. )

मृत्यू –

आज राज्यात ३५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील १८, पुण्यातील ७ , अकोला मनपातील ५, सोलापूर जिल्ह्यात १, औरंगाबाद शहरात १, ठाणे शहरात १आणि  नांदेड शहरात १ मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू आज मुंबईत झाला आहे.

मृत्यूंबद्दल अधिकची माहिती –

आज झालेल्या मृत्यूंपैकी २२ पुरुष तर १३ महिला आहेत. आज झालेल्या ३५ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १३  रुग्ण आहेत तर १९  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या पैकी दोघांच्या इतर आजारांबद्दलची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित ३३ रुग्णांपैकी २३ जणांमध्ये ( ७० %)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५८३ झाली आहे.

प्रयोगशाळा तपासण्या –

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १,७६,३२३ नमुन्यांपैकी १,६२,३४९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १४,५४१जण पॉझिटिव्ह आले आहेत.

क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना –

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १०२६ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १०,८२० सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ४७.३९  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.