कोरोना, द्वेष पसरवणाऱ्या फेक न्यूज आणि आपण!

120
Police personnel punish offenders flouting nationwide lockdown imposed by the government, in the wake of coronavirus pandemic, in Jabalpur, Wednesday, March 25, 2020. Photo: PTI
Police personnel punish offenders flouting nationwide lockdown imposed by the government, in the wake of coronavirus pandemic, in Jabalpur, Wednesday, March 25, 2020. Photo: PTI

डोनाल्ड ट्रम्प यांनी कोविड -१९ ला ‘चायनीज व्हायरस’ म्हणून संबोधले, तेव्हा परदेशी नागरिकांबद्दल बद्दल वाटणारा तिरस्कार किंवा भीती मांडणाऱ्या भाषेला ‘ चायना व्हायरस ‘किंवा त्याहूनही वाईट म्हणजे’ कुंग फ्लू’ हे दोन नवीन शब्द मिळाले. हे दोन्ही शब्द आता ट्वीटरवर ट्रेंडिंग हॅशटॅग आहेत.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी व्हायरसबद्दल चुकीची माहिती देणे आणि पसरवणे हा चीनला लक्ष्य करण्यासाठी माध्यमांत रचण्यात आलेला विषारी कट होता. तो एका मोठ्या, जागतिक घटनेचा भाग होता. हे समजून घेण्यासाठी नेते काय म्हणतात, ते कसे आणि केव्हा म्हणतात,  या माहितीचे संदर्भ तपासणे अत्यंत गरजेचे आहे.

 कोविड -१९ च्या संदर्भात पसरवण्यात आलेल्या चुकीच्या माहितीचा अभ्यास केला तर स्पष्ट दिसतंय की या कथांचा  महत्त्वपूर्ण हेतू द्वेष निर्माण करणे हाच आहे. यामध्ये प्रामुख्याने चिनी लोक आणि त्यांच्या संस्कृतीबद्दलच्या गृहीत कल्पना, त्यांचे खाद्यपदार्थ पाककृती आणि सामाजिक पद्धती यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जाते. जगाला भेडसावाणाऱ्या या महासंकटाकडे लक्ष वेधण्याऐवजी ट्रम्प यांनी वावदूक बोलत चिनी अमेरिकन लोकांवर अश्लाघ्य टीका करून त्यांच्यामध्ये परकेपणाची भावना पेरली आणि प्रबळ केली. .

आता आपल्याकडे नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन जाहीर केलेल्या तीन आठवड्यांमध्ये डिजिटल माध्यमांचा वापर प्रचंड वाढेल आणि कोविड-१९ विषयीच्या संभ्रमामुळे आणि भीतीच्या वातावरणामुळे चुकीच्या माहितीचा पूर तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचेल.आणि यासर्वांमध्ये येणा-या संकटाच्या काळात मोदींची संवाद करण्याची शैली आणि इतिहास, माहितीचे वातावरण घडवण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे.

सर्वसाधारणपणे, फेक न्यूजचा उपयोग करून बिनबुडाचे दावे, सवंग मथळे, संदर्भ बदलून किंवा सोडून दिल्या जाणाऱ्या बातम्या, वास्तवाची चतुराईने केलेली मोडतोड आणि पुनर्रचना यांचा वापर करून संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जाते. यापैकी, बिनबुडाचे दावे, सवंग मथळे यांचे काम अज्ञानामुळे रुजलेल्या संकल्पना अधिक घट्ट करणे हे असते; तर संदर्भ बदलून किंवा सोडून दिल्या जाणाऱ्या बातम्या तसेच वास्तवाची चतुराईने केलेली मोडतोड आणि पुनर्रचना यांचा उपयोग चुकीची माहिती पसरवण्यासाठी केला जातो. हे आपल्या आयुष्यात रोजच घडतंय.

या सर्वाचा आपल्या नजीकच्या भविष्यावर काय परिणाम होईल हे जाणून घेण्यासाठी चुकीच्या माहितीचे पितळ उघडे पाडण्या-या प्रमुख सहा वेबसाईटचा अभ्यास आम्ही केला आहे. यातून फेक न्यूजची शैली आणि त्यात दडलेले प्रमुख विषारी प्रवाह उघड करणे, हा आमचा हेतू आहे. आम्ही यात आठवड्यातील घटनांशी संबंधित बातम्या निवडल्या आहेत.

कशी असते फेक न्यूजची शैली?

 फेक न्यूज किंवा पोस्टची शैली ही त्याची व्याप्ती, ध्येय तसेच सफाई पोष्ट लिहिणाऱ्याच्या कुवतीवर अवलंबून असते. हे थोडेसे ऑन लाईन फिशिंग सारखे आहे. सुजाण वाचकाला संशय येऊ शकेल अशा काही खुणा अनेकदा या मजकूरांमध्ये दिसतात. चुकीची माहिती व्हायरल करण्यासाठीची घाई आणि वाईट व्याकरण अनेकदा सहज लक्षात येतं. पण वाचकांच्या अज्ञाचा फायदा घेण्यासाठी रचलेले संदेश अधिक सफाईदार असतात.

मोठ्या संस्थांच्या नावाने येणारे संदेश:

असे संदेश मोठ्या संस्थांच्या लेटरहेडवर किंवा ट्वीटवर किंवा फेसबुक पोस्टच्या स्क्रीनशॉटवर औपचारिक घोषणा म्हणून सादर केली जातात. या मुळे माहितीची विश्वासार्हता वाढते. पण यामुळे तो संदेश खरा आहे कि खोटा हे पडताळणेही सोपे होते. एखाद्या वृत्तपत्राचा किंवा वृत्तवाहिनीचा लोगो किंवा एखादया मोठ्या संस्थेचे लेटरहेड घेतले जाते आणि त्याच्याखाली हवा तो मजकूर चिकटवून ही ब्रेकिंग न्युजची  चलाखी केली जाते.

संदर्भरहित तपशीलः

संदेश खरा वाटावा यासाठी विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे योग्य तापमान, उपचाराचे वेळापत्रक, किंवा विषाणूचा मायक्रॉन मध्ये सांगितलेला आकार अशा बारीक सारीक तपशिलांचा वापर चतुराईने केला जातो. पण याला कोणताही पडताळून पाहण्याजोगा संदर्भ दिलेला नसतो.

बिभत्स प्रतिमा आणि मजकूर:

अधिकृत घोषणा किंवा मीडिया स्त्रोतांकडील अधिकृत बातम्या किंवा माहितीमध्ये सहसा हिसंक किंवा बिभत्स प्रतिमा  वापरल्या जात नाहीत. या उलट फेक न्यूजमध्ये अपेक्षित परिणाम साधण्यासाठी अशा हिंस्त्र फोटोसोबत अतिरंजित भाषा देखील वापरलेली असते.

आम्हाला आढळलेल्या अनेक फेक न्यूज मध्ये अनेक  पूर्व आशियाई लोकांचे, बाजारपेठेचे, संदर्भ नसलेले फोटो वापरलेले असतात. यातून धोकादायक मालाचा व्यापार करत असल्याच्या बातम्या, किंवा संसर्ग रोखण्यासाठी त्या देशातले पोलीस आणि प्रशासन  कसे कडक वागताहेत अशा बातम्या असतात.

coronavirus in India, coronavirus in india update,coronavirus in Italy, coronavirus in tamil nadu, coronavirus in india death ,Coronavirus, Corona, Mask, corona vaccine update, corona means, corona in Noida, corona vaccine usa, corona meaning English, corona meaning in tamil, कोरोना वायरस का गाना, कोरोनावायरस सॉन्ग, corona virus in Noida, कोरोनाव्हायरस व्हिडीओ, कोरोना खबर, कोरोना वायरस सॉन्ग, कोरोनावायरस के बारे में बताओ, कोरोना वायरस बद्दल माहिती, कोरोना वायरस कैसा होता है, कोरोना वायरस कब खत्म होगा, कोरोना वायरस की दुआ, कोरोना वायरस गाणे, कोरोना वायरस अपडेट,महाराष्ट्र एकूण रूग्ण, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, नागपूर, कल्य़ाण डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे, यवतमाळ, अहमदनगर, पनवेल, सातारा, उल्हासनगर, वसई विरार, पालघऱ, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, रत्नागिरी, कोल्हापूर, गोंदिया,coronavirus Live Updates, Global Death, India Death Update, lockdown, migration in India, Italy Death Update, united states Corona virus Update, USA death Update, toll India, new cases, new cases in Maharashtra

सेलेब्रिटींच्या पोस्ट:

चुकीची माहिती असलेल्या पण अत्यंत वेगाने पसरत गेलेल्या पोस्ट पुरेशी माहिती नसणाऱ्या सेलेब्रिटींनी टाकल्या आहेत. अमिताभ बच्चन, रजनीकांत, पवन कल्याण, मोहनलाल तसेच अनेक दुय्यम स्तरातील सेलिब्रिटी विदुषकांनी सोशल मीडियातून कोव्हीड-१९ च्या संसर्गापासून वाचण्यासाठी घरगुती उपाय आणि तथाकथित पारंपारिक भारतीय ज्ञानाच्या हवाल्याने अकलेचे तारे तोडले आहेत.

बनवाबनवीतली द्वेष पसरवणारी सूत्रबद्धता:

आपल्या पर्यत येणारी कोविड-१९शी संबंधित चुकीची माहिती आणि इतर “बनावट बातम्या” यामध्ये एक सूत्र आहे. कोरोना साथीच्या प्रकरणात, जागतिक मीडियातली घबराट , आणि अशा आरोग्यविषयक संकटांशी सामना करण्याचा अलीकडचा अनुभव नसणे, यामुळे जाणीवपूर्वक आणि खोडसाळपणे निर्माण केल्या जाणाऱ्या आणि पसरवल्या जाणा-या फेक न्यूजसाठी अगदी पोषक वातावरण निर्माण झालंय.

म्हणूनच आम्ही कोविड-१९ बद्दल चुकीची माहिती पसरवणाऱ्या बातम्यांचा अभ्यास केला. त्यात असं आढळलं की या बातम्यांमध्ये प्रामुख्याने धोक्याची घंटा वाजवणाऱ्या, एखाद्या परिस्थितीत सुधारणा झाल्याचं सांगणा-या किंवा  एखाद्या परिस्थितीचे स्पष्टीकरण करणाऱ्या बातम्या आहेत आणि या बातम्या अस्तित्वात असलेले पूर्वग्रह आणि अज्ञान अधिक घट्ट करणाऱ्या आहेत.

धोक्याची घंटा वाजवणाऱ्या बातम्या :

धक्कादायक प्रतिमांच्या माध्यमातून, वाचकाचे लक्ष वेधून घेण्यासाठी फेक न्यूजमध्ये संकटाच्या प्रमाणाबद्दल किंवा तीव्रतेबद्दल उदा. जखमींची संख्या, संसर्गाचा वेग किंवा रुग्णांचे होणारे हाल याबाबत अवास्तव दावे केलेले असतात.

धोक्याची घंटा वाजवणाऱ्या बातम्यांमध्ये ‘या व्हायरसची प्रसारक्षमता  त्याच्या नैसर्गिक क्षमतेपेक्षा अधिक असून जनतेच्या सुरक्षा आणि आरोग्यावर हल्ला करणारे हे परदेशी आक्रमण आहे’ हे सूत्र आम्हाला आढळले आहे.

coronavirus in India, coronavirus in india update,coronavirus in Italy, coronavirus in tamil nadu, coronavirus in india death ,Coronavirus, Corona, Mask, corona vaccine update, corona means, corona in Noida, corona vaccine usa, corona meaning English, corona meaning in tamil, कोरोना वायरस का गाना, कोरोनावायरस सॉन्ग, corona virus in Noida, कोरोनाव्हायरस व्हिडीओ, कोरोना खबर, कोरोना वायरस सॉन्ग, कोरोनावायरस के बारे में बताओ, कोरोना वायरस बद्दल माहिती, कोरोना वायरस कैसा होता है, कोरोना वायरस कब खत्म होगा, कोरोना वायरस की दुआ, कोरोना वायरस गाणे, कोरोना वायरस अपडेट,महाराष्ट्र एकूण रूग्ण, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, नागपूर, कल्य़ाण डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे, यवतमाळ, अहमदनगर, पनवेल, सातारा, उल्हासनगर, वसई विरार, पालघऱ, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, रत्नागिरी, कोल्हापूर, गोंदिया,coronavirus Live Updates, Global Death, India Death Update, lockdown, migration in India, Italy Death Update, united states Corona virus Update, USA death Update, toll India, new cases, new cases in Maharashtra
Image from an art project in Germany attributed as Coronavirus deaths on the streets of Wuhan (Source: Webqoof)

उपचार आणि परिस्थितीतली सुधारणेबद्दलच्या बातम्या:  

परिस्थितीत सुधारणा कशी होईल याबाबत दावे करणाऱ्या अनेक फेक न्यूज आपण पहिल्या तर, कोविड-१९ च्या बाबतीत, प्रतिबंधक म्हणवले जाणारे व्यायाम, योग, तसेच उपचार म्हणून दावा केलेली नैसर्गिक किंवा रासायनिक संयुगे उदा. लसणाचे काढे, अल्कोहोल किंवा भांग वापरण्यासाठीच्या शिफारसींसारख्या घरगुती उपचार सुचवणाऱ्या भंकस बातम्या आपल्याला दिसतात.

भारतात तर गोमुत्र, गायीचे शेण हे आयुर्वेदिक उपचारांचा भाग म्हणून प्रतिबंधक उपाय म्हणून वापर करण्याचे सल्ले दिले गेले. यापैकी काही दावे अधिकृत स्त्रोत किंवा मुख्य प्रवाहातील माध्यमांद्वारे करण्यात आले आहेत. ‘जनता कर्फ्यू’ आणि त्यातल्या टाळ्या वाजवण्याच्या प्रयोगामध्ये व्हायरस पळवून लावण्याची ताकद आहे; असे दावे सेलिब्रिटींसह अनेक लोकांनी केले.

An announcement by the PIB promoting un-evidenced claims of alternative medicines for Coronavirus prevention (Source: AltNews)

निसर्ग आणि पर्यावरणाबद्दलच्या बातम्या:

या आजाराच्या उगमाबद्दलच्या फेक न्यूजचे तर पेवच फुटले आहे. हा आजार प्राणीजन्य असून सर्वांनी आता शाकाहारी व्हावे अशा आशयाच्या बातम्यांची रांग लागली आहे. या बातम्यांच्या माध्यमातून मांसाहाराविरुद्ध आणि मासाहार करणाऱ्या लोकांविरुद्ध जणू एक सांस्कृतिक युद्धच खेळले जात आहे.

व्यावसायिक मांस उत्पादनाचे फार्म्स किंवा मांसाच्या बाजारपेठेतून घेतलेली खूप बीभत्स छायाचित्रं व्हायरल केली जात असून या बातम्या शेवटी समूहांच्या शाकाहारी किंवा मांसाहारी  खाण्याच्या सवयींच्या आख्यानांवर घसरतात. इटलीतल्या शटडाऊनमुळे व्हेनिसमधील निळ्याशार पाण्याकडे डॉल्फिन पुन्हा परतत आहेत अशा निसर्गविषयक फेक न्यूजही सध्या बाजार गरम करत आहेत.

सांस्कृतीक युद्ध:

फेक न्यूजच्या माध्यमातून एक सांस्कृतिक युद्ध खेळलं जातंय. या व्हायरसचा उगम आणि प्रसार चीनी संस्कृती विशेषतः खादय संस्कृती मुळे झाला आहे अशा फेक न्यूज पसरत आहेत तर इस्लामी आणि हिंदू संस्कृती मध्ये या महामारीवर रामबाण (किंवा रहीमबाण) उपाय  आहेत अशा बातम्याही वारंवार येत आहेत.

अशा बातम्या बर्‍याचदा विद्यमान बावळट अंधश्रद्धा  बळकट करण्यासाठी पसरवलेल्या असतात. भारतातल्या सोशल मीडियावर, ज्योतिष, सकारात्मक स्पंदने किंवा गोमूत्र यांच्याशी संबंधित प्राचीन ज्ञानाबद्दल संदेश मोठ्या प्रमाणात  पसरवल्या जात आहेत. आपली संस्कृती मुळातूनच जबाबदार आणि ज्ञानी असल्याने संकटाला तोंड देण्यासाठी ती अधिक सुसज्ज आहे असे समाजमानस घडवण्याचा प्रयत्न यातून होत आहे. साहजिकच यामधून दुसऱ्या संस्कृती आणि धर्माबद्दल द्वेष निर्माण होतो.

Baba Ramdev targeted with an old image for being hospitalized due to consumption of cow urine and being infected by Coronavirus (Source: Webqoof)

चुकांची साखळी:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शटडाऊन घोषित केल्यामुळे कोरोनाव्हायरसच्या भोवतालच्या फेक न्यूज कमी होण्याऐवजी का वाढल्या हे एकदम लक्षात आले. तीन आठवड्यांच्या संपूर्ण शटडाऊनच्या टोकाच्या घोषणेमुळे सामाजिक अंतर राखण्या बाबत प्रशासन गंभीर आहे हा संदेश दिला गेला हे खरं असलं तरी हा संदेश देण्याची पद्धत गांभीर्य समजावून देण्याएवजी ज्यादाच्या शोबाजीची होती.

संध्याकाळी ८ वाजता ही वेळ मोदींची लोकांना आश्चर्यचकित करण्याची आवडती वेळ आहे, हा इतिहास आहे. काही दिवसांपूर्वी मोदिंनी याच वेळेला भाषण करून  नागरिकांकडून  काही आठवड्यांची मुदत मागितली होती.

मंगळवारी, त्यानीं आपल्या भाषणात लोकांना आठवण करून दिली की त्यांनी आधीच धोक्याचा इशारा दिला होता. ह्या चालीवर मोदी पुढे काय बोलणार याचा अंदाज लोकांना आला होता. लोकांचे दैनंदिन जीवन कसे सुरळीत होईल याविषयी बोलून भाषण सुरू करण्याऐवजी मोदींनी ‘लक्ष्मणा रेखा’ या पौराणिक रूपकाचा उपयोग केला त्यामुळे किराणा  आणि भाजीपाला विकत घेऊन बेगमी करण्यासाठी बाजारपेठेत भयभीतांची अभूतपूर्व गर्दी उसळली.

खुद्द पंतप्रधानांनी केलेल्या आश्चर्यकारक घोषणेतली नाट्यमयता जरी राखण्यासाठी, सरकारने दर आठवड्याला नवी घोषणा करण्याचे तंत्र अवलंबल्यामुळे नोटाबंदीनंतरच्या काही दिवसांमध्ये फेक न्युजची चलती होती. हे आपण अनुभवले आहे.

आपले सध्याचे संकट कित्येक पटीने अधिक तीव्र आहे. पंतप्रधान आणि सरकार सर्वसाधारण लोकांना आश्चर्यचकित करण्याची जुनी जादू पुन्हा वापरत आहेत आणि लोक पुढच्या प्राइम-टाइमला मोदींच्या ‘एकतर्फी‘ सर्जिकल स्ट्राइक’च्या घोषणेची वाट पाहत  बसून रहात आहेत.

सततच्या अनिश्चित वातावरणामुळे चुकीची माहिती किंवा फेक न्यूजची चलती आहे. कारण जेंव्हा अनिश्चितताच अनिर्बंध  माहिती प्रसारणाचा पाया बनते तेव्हा अफवा हा सर्वात चांगला दिलासा बनतो.

जॉयजीत पाल हे मिशिगन युनिव्हर्सिटीत असोसिएट प्रोफेसर आहेत, राजकीय नेत्यांद्वारे सोशल मीडियाच्या वापरावर त्यांचे संशोधन सुरु आहे. सयदा जैनाब अकबर या एक संशोधक आहेत.

अनुवाद : रविंद्र झेंडे, पत्रकार, लेखक आणि अभ्यासक

सदर लेख द वायर या ऑनलाईन वेबसाईटवरुन भाषांतरीत करण्यात आला आहे.