कोरोना व्हायरस … अन्यथा अर्थवव्यस्थेला कोणीही वाचवू शकणार नाही : डॉ. अजित नवले

144

जगावरती आलेल्या कोरोनाच्या संकटाने देशाला देखील विळखा बसला आहे. सर्वाचं यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हजारो लोकांचा जीव गेला आहे. कोरोना व्हायरसच्या संकटावर वर मात करण्यासाठी सरकारने लॉक डाऊनची घोषणा केली आहे. मात्र, कोरोना व्हायरसच्या संकटामुळं जीवीत, वित्त हानी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

या संदर्भात अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी मॅक्समहाराष्ट्रच्या व्हीलॉग मध्ये या संदर्भात आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी मोदी सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या घोषणेचं स्वागत केलं. मात्र, या लॉकडाऊन मुळे होणाऱ्या नुकसानाबाबत सरकार ने काही उपाययोजना करण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं.

लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचं मोठ नुकसान होणार आहे. त्यामुळं सरकारने शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं. कोरोना व्हायरसचा विळखा वाढल्याने शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतयं त्यासाठी सरकारनं उपाययोजना करण्याची गरज आहे. यंत्रणांचा समन्वय अपुरा पडत असल्यानं नाशवंत मालाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. तो माल शहराकडे नेण्यासाठी सरकारने तात्काळ यंत्रणामध्ये समन्वय ठेवण्यासाठी प्रयत्न करावा.

लॉकडाऊनमुळे दूधाचे दर कोसळले आहेत. त्यामुळं सरकारने तात्काळ याकडे लक्ष द्यावं अन्यथा पशूधन धोक्यात येईल असा इशारा अजित नवले यांनी दिला आहे. कुक्कटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती पक्षी १०० रुपये आणि प्रती अंड्याला ५ रुपये अनुदान द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. जे ऊस तोड कामगार कारखान्याच्या ठिकाणी अडकले आहेत. त्यांची योग्य व्यवस्था करावी. अशी मागणी अजित नवले यांनी केली आहे.