Home > News Update > कोरोना : सॅनिटायझर, मास्क चा काळाबाजार करणाऱ्यावर कठोर कारवाई : अनिल देशमुख

कोरोना : सॅनिटायझर, मास्क चा काळाबाजार करणाऱ्यावर कठोर कारवाई : अनिल देशमुख

कोरोना : सॅनिटायझर, मास्क चा काळाबाजार करणाऱ्यावर कठोर कारवाई : अनिल देशमुख
X

कोरोना व्हायरसनंतर मास्कचा काळाबाजार व सॅनिटायझर डूप्लीकेट बनवण्याचं कोण काम करत असेल तर अशावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य, अन्न व औषध प्रशासनाकडून आलेल्या सूचनांनुसार गृहविभागातील वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली.

यामध्ये मास्कचा काळाबाजार असेल किंवा सॅनिटायझर डूप्लीकेट प्रकार असेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. शिवाय ज्या फेक न्यूज आहेत. मोबाईलच्या व्हॉटसअप मेसेजवरून गैरसमज पसरवत आहेत. त्यांच्यावर सायबर गुन्ह्याखाली कारवाई करण्यात येणार आहे. असंही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान तुरुंगातील कैद्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर संशयित कुणी सापडलं तर त्यांच्यासाठी अतिदक्षता विभाग स्थापन करून त्यांच्यावर उपचार करण्याच्या सूचना गृहविभागाच्यावतीने पोलिसांना देण्यात आल्या आहेत अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

Updated : 15 March 2020 6:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top