Home > News Update > कोरोना व्हायरस पासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही 'या' गोष्टी टाळल्याच पाहिजे

कोरोना व्हायरस पासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही 'या' गोष्टी टाळल्याच पाहिजे

कोरोना व्हायरस पासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही या गोष्टी टाळल्याच पाहिजे
X

आतापर्यंत मिळालेल्या पुरव्यांनुसार COVID-19 व्हायरस प्रत्येक भागात पसरू शकतो. त्यामुळे ज्या भागात उष्ण आणि आर्द्र हवामान असतं तिथेही हा व्हायरस पसरू शकतो. जर तुम्ही बाधित भागातून प्रवास केला असेल तर संरक्षणासाठी योग्य त्या उपययोजनांचा वापर करा. COVID-19 पासून बचाव करण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे हात स्वच्छ धुणं.

थंड वातावरण किंवा बर्फ कोरोनाच्या विषाणूला मारू शकत नाही

थंड हवामानामुळे कोरोना व्हायरस मरू शकतो हे असं लोकांना वाटतं मात्र हे तथ्य नाही. लोकांचा यावर विश्वास असण्यामागे कोणतंही कारण नाही. बाहेरील वातावरणात आपल्या शरीराचं तापमान सामान्यपणे 36.5°C ते 37°C इतकं असतं. त्यामुळे कोरोना व्हायरसपासून बचाव करायचा असेल तर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरने किंवा पाणी आणि साबणाने हात स्वच्छ ठेवा.

गरम पाण्याने अंघोळ केल्याने कोरोनाचा प्रतिबंध होण्यास मदत होते

गरम पाण्याने अंघोळ केल्याने कोरोनाचा धोका टळतो असं नाही. तुम्ही अंघोळ करत असलेल्या पाण्याचं तापमान कितीही असलं तरीही तुमच्या शरीराचं तापमान सामान्यपणे 36.5°C ते 37°C इतकं असतं. मुख्य म्हणजे कडक गरम पाण्याने अंघोळ करणं तुमच्या शरीराच्या त्वचेसाठी धोकादायक ठरू शकतं.

डासांच्या चावण्याने कोरोना व्हायरस पसरत नाही

डासांच्या चावण्याने कोरोना व्हायरस होतो हे सिद्ध होण्यासाठी अजूनतरी कोणतेही पुरावे नाहीत. हा नवीन कोरोना व्हायरस श्वसनामार्फत शरीरात जाणारा विषाणू आहे. त्यामुळे एखादा माणूस शिंकला किंवा खोकला की त्यामाध्यमातून येणाऱ्या ड्रॉपलेट्सद्वारे पसरतो.

हँड ड्रायरद्वारे कोरोनाचा विषाणू मरत नाही

कोरोनाच्या विषाणूला मारण्यासाठी हँड ड्रायर तितकंस परिणामकारक नाही. त्यामुळे कोरोनासारख्या व्हायरसपासून वाचण्यासाठी हात स्वच्छ ठेवणं हा एक चांगला उपाय आहे. एकदा का तुम्ही हात पाणी आणि साबणाने स्वच्छ धुतलेत की त्यानंतर टॉवेलने पुसून हँड ड्रायरने त्यांना कोरडे करू शकता.

अल्कोहोलयुक्त किंवा क्लोरीनयुक्त स्प्रे संपूर्ण शरीरावर मारल्यास कोरोनाचा विषाणू मरत नाही

अल्कोहोलयुक्त किंवा क्लोरीनयुक्त स्प्रे संपूर्ण शरीरावर मारल्यास कोरोनाचा विषाणू मरत नाही कारण तो विषाणू तुमच्या शरीरात पोहोचलेला असतो. मुख्य म्हणजे अशा प्रकारे संपूर्ण शरीरावर स्प्रे करणं हे कपड्यांसाठी आणि तुमच्या त्वचेसाठी देखील योग्य नाही.

न्यूमोनियाची लस कोरोनाच्या विषाणूपासून संरक्षण करू शकत नाही

न्यूमोनियासाठी देण्यात येणाऱ्या pneumococcal vaccine आणि Haemophilus influenza type B या लसी नवीन कोरोना व्हायरसच्या विषाणूपासून संरक्षण करू शकत नाही. हा व्हायरस नवीन असून त्यासाठी वेगळ्या लसीची गरज आहे. संशोधक या व्हायरसच्या विषाणूवर लस विकसीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

नियमितपणे मिठाच्या द्रावाने नाक साफ केल्याने कोरोनाच्या इन्फेक्शनचा धोका टळत नाही

नियमितपणे मिठाच्या द्रावाने नाक साफ केल्याने लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही असं कुठेही आढळून आलेलं नाही. मात्र असे काही मर्यादित पुरावे आहेत की नियमितपणे मिठाच्या द्रावाने नाक स्वच्छ केल्यास सामान्य सर्दीतून लवकर बरं होण्यास मदत होते.

लसूणच्या सेवनामुळे कोरोनाच्या इन्फेक्शनला प्रतिबंध होत नाही

लसून आरोग्यासाठी उत्तम असून त्यामध्ये antimicrobial गुणधर्म असतो. मात्र लसूणच्या सेवनामुळे कोरोनाचा धोका टळला असं आतापर्यंत निदर्शनास आलं नाही.

कोरोना व्हायरसचा संसर्ग कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो.

कोरोनाचा संसर्ग वृद्ध व्यक्ती किंवा तरूण मुलांना होऊ शकतो. मात्र वृ्द्ध व्यक्ती आणि ज्या व्यक्तींना अस्थमा, मधुमेह आणि हृदयाचे आजार असतात त्यांना या व्हायरसची लागण होण्याची शक्यता असते.

नवीन कोरोना व्हायरसच्या उपचारांसाठी अ‍ॅन्टीबोयटीक्सचा वापर केला जाऊ शकत नाही

अ‍ॅन्टीबोयटीक्स व्हायरसविरूद्ध लढा देऊ शकत नाही. अ‍ॅन्टीबोयटीक्स फक्त बॅक्टेरियावर उपायकारक ठरतो. आणि नवीन कोरोना व्हायरस हा व्हायरस असल्याने अ‍ॅन्टीबोयटीक्स त्यावर काम करणार नाही.

कोरोना व्हायरसवर उपचारांसाठी कोणतंही विशिष्ठ औषध नाही

आतापर्यंत कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी विशिष्ठ औषध नाही. मात्र ज्या व्यक्तींना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे त्यांची काळजी घेतली पाहिजे तसंच दिसून येणाऱ्या लक्षणांनुसार त्यांच्यावर उपचार करावे. संशोधक या व्हायरसवरील औषध विकसीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सौजन्य : माय मेडिकल मंत्रा

Updated : 19 March 2020 11:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top