Home > News Update > 'या' जिल्ह्यात कोरोना एकच रुग्ण, प्रशासनाचा जिल्हाला ग्रीन झोन करण्याचा प्रयत्न

'या' जिल्ह्यात कोरोना एकच रुग्ण, प्रशासनाचा जिल्हाला ग्रीन झोन करण्याचा प्रयत्न

या जिल्ह्यात कोरोना एकच रुग्ण, प्रशासनाचा जिल्हाला ग्रीन झोन करण्याचा प्रयत्न
X

राज्यातील काही जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात फक्त कोरोना चा एकच रुग्ण आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 2 मे रोजी आढळलेल्या पॉझिटिव रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या संपर्कातील परिवारासह आतापर्यंत घेण्यात आलेल्या 59 स्वॅब नमुन्यांपैकी सर्व 59 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह रुग्ण सध्या नागपूर येथे कोविड शिवाय अन्य आजारावर उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे नागपूर रुग्णालयातून कळविण्यात आले आहे.

जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून आज दुपारी जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 59 नागरिकांपैकी सर्व 59 अहवाल निगेटिव्ह आलेले आहे. दरम्यान आतापर्यंत या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 95 लोकांची यादी तयार करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रतिबंधित क्षेत्रामध्ये महानगरपालिका आरोग्य विभागाच्या 47 चमू कार्यरत आहे. यांनी 11 मे रोजी या प्रतिबंधित क्षेत्रातील 2 हजार 152 घरांमध्ये राहणाऱ्या 8 हजार 540 नागरिकांचे सर्वेक्षण केले. यामध्ये अतिगंभीर श्वसनाचा आजार असणारे 11 रुग्ण संशयित होते. मात्र त्यांचा देखील यासंदर्भातील अहवाल निगेटिव्ह आला आहे.

जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील ताजी आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत २२o लोकांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. यापैकी कृष्ण नगर येथील रुग्णांचा एकमेव अहवाल पॉझिटिव्ह आला होता. १९५ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. या पैकी आता २४ अहवाल प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यामध्ये चंद्रपूर महानगर क्षेत्रांमध्ये संस्थात्मक अलगीकरण करण्यात आलेले १२१, तालुका स्तरावर संस्थात्मक अलगीकरण करण्यात आलेले १२३ तर एकूण रूग्ण संख्या २४४ आहे.

जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत गृह अलगीकरण केलेल्या रुग्णांची संख्या ५४ हजार २३४ आहे. यामध्ये ग्रामीण भागात सर्वाधिक ४६ हजार २५९, महानगरपालिका क्षेत्रात ३३२१ तर जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रामध्ये ४ हजार ६५४ व्यक्तींना गृह अलगीकरण करण्यात आले आहे. सध्या १५ हजार १२३ नागरिक गृह अलगीकरणात आहेत.

Updated : 12 May 2020 5:37 AM GMT
Next Story
Share it
Top