CoronaVirus: मुंबईत 5 हजाराहून अधिक जण ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये

navirus in india update,coronavirus in Italy, coronavirus in tamil nadu

मुंबईत कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढू लागलाय. देशाच्या आर्थिक राजधानीत कोरोना वाऱ्यासारखा पसरतोय. कोरोना व्हायरस मुंबईच्या झोपडपट्यांमध्ये पोहोचलाय. कोरोनाचा संसर्ग सामान्यांना होण्यापासून रोकण्याचं मोठं आव्हान आरोग्य यंत्रणांसमोर आहे. मुंबईत १६२ कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. या लोकांच्या संपर्कात आलेल्या ५,४४३ हाय रिस्क लोकांची माहिती मुंबई महापालिकेकडे आहे. या सर्वांना आयसोलेशन आणि क्वारेंन्टाईनमध्ये ठेवण्यात आलंय. यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णाचे कुटुंबीय, नातेवाईक आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणी संपर्कात आलेल्या व्यक्ती आहेत.

“मुंबईत १४६ विभाग कंटनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. मुंबईतील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व ५,४४३ लोकांची कोरोना टेस्ट आम्ही करत आहोत. यासाठी त्यांच्या घशाचे स्वॅब (नमुने) घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या सर्व हाय रिस्क कॉन्टॅक्टवर लक्ष ठेवण्यासाठी ४,००० आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत,“ अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीये.

मुंबई महापालिकेने कंटनमेंट झोनसोबत, ५ कोरोनाचे हॉट स्पॉट ओळखले आहेत.

वरळी कोळीवाडा, एलफिस्टन.  कलिना यांसारख्या भागातून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या अधिक आढळून आलीये. यातील काही लोकांचा परदेशी प्रवासाचा इतिहास, कोरोनाग्रस्त रुग्णांशी संपर्क नसल्यानंतरही त्यांना आजार झालाय.

“परदेशी प्रवासाचा इतिहास, रुग्णांशी संपर्क नसलेल्यांनाही कोविड-१९ची लागण झाल्याचं समोर आलंय. मात्र ही संख्या फार कमी आहे. महाराष्ट्र अजूनही संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचलेला नाही. राज्य सरकारकडून याचा प्रसार रोखण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत.” यासंदर्भात माय मेडिकल मंत्राने वृत्त दिलं आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी मुंबई महापालिकेच्या कोविड-१९ वॉर रुमला भेट दिली. या वॉररूममध्ये काम कसं चालतं याचा आढावा त्यांनी घेतला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माहितीनुसार, “कंटेनमेंट झोनमध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जावून चौकशी करण्यात येत आहे. त्याचसोबत लो-रिस्क कॉन्टॅक्टची फोनद्वारे माहिती घेण्यात येत आहे. मुंबईतील ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरांच्या मदतीने प्रत्येक विभागावर लक्ष ठेवण्यात येत आहे. जेणेकरून रस्त्यावर गर्दी होणार नाही.“

“दिल्लीतील तबलीक जमातच्या कार्यक्रमात मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि इतर जिल्ह्यातील लोकं सहभागी झाले होते. यां सर्वांचे पत्ते शोधून त्यांची चौकशी करण्याचं काम सुरू झाल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले.

“मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या येत्या काही दिवसात आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, ही संख्या कमी करण्यासाठी राज्यसरकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत,“ .

या संदर्भात मेडिकल क्षेत्रात काम करणारे तज्ञ पत्रकार मयांक भागवत यांनी घेतलेल्या आढावा नक्की पाहा….