Home > News Update > राज्यात कोरोना च्या चाचण्या वाढणार, 'हे' आहे कारण...

राज्यात कोरोना च्या चाचण्या वाढणार, 'हे' आहे कारण...

राज्यात कोरोना च्या चाचण्या वाढणार, हे आहे कारण...
X

राज्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोग शाळांची संख्या 103 एवढी झाली असून त्यामध्ये 60 शासकीय तर 43 खासगी प्रयोगशाळा आहेत. 26 मे 20 जून या कालावधीत प्रयोगशाळांच्या संख्येत 30 ने वाढ झाली असून प्रति दशलक्ष चाचण्यांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. असे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

9 मार्च रोजी राज्यात कोरोनाचा पाहिला रुग्ण आढळून आला त्यावेळेस मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणी चाचण्यांची सुविधा होती. त्यानंतर कोराना चाचण्यांच्या सुविधेत दिवसेंदिवस राज्यशासनाने वाढ केल्याने ही संख्या आता 103 एवढी झाली आहे. राज्याचे प्रतिदशलक्ष प्रयोगशाळा नमुन्यांचे प्रमाण 5847 एवढे असून देशपातळीवरील हे प्रमाण 4610 एवढे आहे.

देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात होत असून गेल्या तीन महिन्यात सातत्याने चाचण्यांची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रत्नागिरी, सिंधुदूर्ग, मुंबईतील जी.टी. हॉस्पीटल येथील प्रयोगशाळांचा शुभारंभ गेल्या आठवड्यात झाला. कालपर्यंत 7 लाख 73 हजार 865 एवढे नमुने पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 लाख 32 हजार 75 एवढे नमुने पॉझीटीव्ह आले आहेत. एकूण पाठविलेल्या नमुन्यांपैकी पॉझिटीव्ह आलेल्या नमुन्यांचे प्रमाणे हे 17 टक्के आढळून आले आहे.

26 मे रोजी राज्यात 73 प्रयोगशाळा होत्या त्यावेळी प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण 3 हजार 347 एवढे होते. 29 मे रोजी 77 प्रयोगशाळा तर प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण 3387 होते. 5 जून रोजी राज्यात 83 प्रयोगशाळा होत्या तर प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण 4086 एवढे होते. 12 जून रोजी 95 प्रयोगशाळा तर प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाणे 4861 एवढे होते. 21 जून रोजी 103 प्रयोगशाळा तर प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण 5847 एवढे आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात प्रयोगशाळांची संख्या अनुक्रमे अशी

मुंबई- 27(शासकीय 12, खासगी 15), ठाणे- 7(शासकीय 2, खासगी 5), नवी मुंबई- 3(शासकीय 1, खासगी 2), पुणे- 22, (शासकीय 10, खासगी 12), नागपूर- 11(शासकीय 7, खासगी 4), कोल्हापूर- 3(शासकीय 2, खासगी 1), नाशिक- 4(शासकीय 2, खासगी 2), सातारा- 2(शासकीय 1, खासगी 1), अहमदनगर – 2 (शासकीय 1, खासगी 1), पालघर (डहाणू) – 1, रत्नागिरी -1, सिंधुदूर्ग – 1,सांगली (मिरज)- 1, सोलापूर- 2, धुळे- 1

जळगाव – 1, अकोला- 1, अमरावती- 2, यवतमाळ- 1, गडचिरोली- 1, चंद्रपूर-1, गोंदिया - 1, वर्धा- 1, औरंगाबाद- 1, नांदेड- 2, बीड- 1, लातूर- 1, परभणी- 1

Updated : 22 Jun 2020 7:36 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top