Home > News Update > कोरोनाशी लढा - PPE कीट आणि N-95 मास्कवरील कोरोना विषाणूंना मारता येणार?

कोरोनाशी लढा - PPE कीट आणि N-95 मास्कवरील कोरोना विषाणूंना मारता येणार?

कोरोनाशी लढा - PPE कीट आणि N-95 मास्कवरील कोरोना विषाणूंना मारता येणार?
X

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भामुळे एकीकडे सर्वसामान्यांना संसर्गाचा धोका आहे तर कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांनाही याची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठातील प्राध्यपकांनी पीपीई कीट आणि एन-९५ मास्कवर जमा होणारे कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानावर आधारीत अँटीव्हायरल कोटींग्स तयार केली आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. विश्वनाथ पाटील आणि स्वच्छ ऊर्जा अलाएन्सचे डॉ. सुनील पेशणे तसंच त्यांचा एक विद्यार्थी रोशन राणे यांनी एकत्र येऊन विशिष्ट प्रकारच्या पॉलिमर्समध्ये नॅनो पार्टीकल्स बनवून त्याची कोटींग केली आहेत. पीपीई कीट आणि मास्कवर जमा होणारे विषाणू नष्ट करण्यासाठी विशिष्ट पॉलिमर्सची गरज असते. त्याचबरोबर वैद्यकीय पातळीवर प्रमाणित पॉलिमर्सचाच यात वापर करणे गरजेचे होते. यात कोटींग्स तयार करण्यासाठी कोणत्याही घातक रसायनांचा वापर करण्यात आलेला नाही, असंही विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे.

विशेष बाब म्हणजे ही कोटींग्स अवघ्या चार तासात तयार केली जाऊ शकतात आणि ती पंधरा मिनीटात वापरात देखील आणली जाऊ शकतात. विद्यापीठात तयार करण्यात आलेल्या या अँटीव्हायरल कोटींग्सची PPE कीट आणि N-95 मास्कच्या पॉलिमर्सवर प्राथमिक चाचणीसुद्धा करण्यात आली आहे. या कोटींग्सच्या कोरोना विषाणूंना मारण्याच्या क्षमतेची लवकरात लवकर चाचणी घेण्यात यावी यासाठी हे दोन्ही संशोधक प्रयत्नशील आहेत.

पुण्यातील National Institute of Virology इथं ही कोटींग्स तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. विशेष बाब म्हणजे हा प्रकल्प डीएसटीला नुकताच सादर करण्यात आला आहे. दम्यान “कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून बचावासाठी उपाययोजना करण्याकरीता आणि या संकटकावर मात करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. याच शैक्षणिक उपक्रमातील हा एक टप्पा आहे. शैक्षणिक क्षेत्रातून जेवढी भरीव मदत करता येईल त्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे”, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, यांनी सांगितले आहे.

Updated : 7 May 2020 1:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top