Home > News Update > बॉलिवूडमध्ये कोरोना: अमिताभ बच्चन रुग्णालयात, रेखाचा बंगला सील

बॉलिवूडमध्ये कोरोना: अमिताभ बच्चन रुग्णालयात, रेखाचा बंगला सील

बॉलिवूडमध्ये कोरोना: अमिताभ बच्चन रुग्णालयात, रेखाचा बंगला सील
X

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. बच्चन यांना कोरोना ची लागण झालं असल्याची माहिती स्वत: बच्चन यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. बॉलिवूडमध्ये कोरोनाची लागण झालेले बच्चन हे पहिले अभिनेते नाहीत. कारण अनेक अभिनेत्याच्या ड्रायव्हर, घरात काम करणारे व्यक्ती यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण परिसराला सॅनिटाइज केलं आहे.

नुकतंच अभिनेत्री रेखा यांच्या सुरक्षारक्षकाला करोनाची लागण झाल्याचं समोर रेखा यांचा मुंबईतील बंगला सील केला आहे. त्याचसोबत त्यांच्या बंगल्याबाहेर कंटेन्मेंट झोन असल्याचा फलकही लावण्यात आला आहे.

रेखा यांचा वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात ‘सी स्प्रिंग’ हा बंगला आहे. मुंबई महानगरपालिकेने हा संपूर्ण परिसर सॅनिटाइज केला आहे.

Updated : 11 July 2020 6:01 PM GMT
Next Story
Share it
Top