Home > News Update > लॉकडाऊन वाढणार का? पंतप्रधान मोदींनी दिले 'हे' संकेत

लॉकडाऊन वाढणार का? पंतप्रधान मोदींनी दिले 'हे' संकेत

लॉकडाऊन वाढणार का? पंतप्रधान मोदींनी दिले हे संकेत
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्व पक्षांच्या संसदेतील सभागृह नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे चर्चा संवाद साधला. यावेळी लॉकडाऊन १४ एप्रिलनंतरही वाढवण्याबाबत विचार सुरू असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितल्याचे काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. तर १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन पूर्णपणे हटवणार नाही असे संकेत मोदींनी दिल्याची माहिती या बैठकीत सहभागी झालेल्या बिजू जनता दलाचे नेते पिनाकी मिश्रा यांनी दिली आहे. या बैठकीला उपस्थित असलेले काँग्रेसेचे नेते गुलाम नबी आझाद यांनीही ८० टक्के नेत्यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जावा अशी मागणी केल्याचे सांगितले आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत तज्ज्ञ आणि सर्व राज्यांच्या प्रमुखांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय़ घेणार असल्याचं सांगितल्याचे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.

दरम्यान या बैठकीत काही नेत्यांनी संपूर्ण लॉकडाऊन वाढवण्यापेक्षा जी राज्य किंवा जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत त्यातच लॉकडाऊन वाढवावे अशी भूमिका मांडल्याचेही गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. देशात कोरोनावर पूर्णपणे नियंत्रण नसल्याने लॉकडाउन पुढे वाढवले जाणार की १४ एप्रिलला संपणार याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या बैठकीत नरेंद्र मोदींनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार काय पावलं उचलत आहे याची माहिती दिली. यावेळी विविध राज्यातील नेत्यांनी आपापल्या राज्यांमध्ये निर्माण झालेल्या समस्यांची माहिती दिली. तसंच केंद्राकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली.

Updated : 8 April 2020 1:31 PM GMT
Next Story
Share it
Top