‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा एकच अॅक्टीव रुग्ण, तुमच्या जिल्ह्यातील अॅक्टीव रुग्ण संख्या किती?

राज्यात आज १३५२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३३ हजार ६८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २९३३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४१ हजार ३९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३७ खाजगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख १० हजार १७६ नमुन्यांपैकी ७७ हजार ७९३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ६० हजार ३०३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७३ हजार ०४९ खाटा उपलब्ध असून सध्या ३० हजार ६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १२३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ६८ (मुंबई ४८, ठाणे ८, नवी मुंबई ६, वसई विरार १, पालघर १, पनवेल १), नाशिक- २५ ( धुळे १, जळगाव २१, नाशिक ३), पुणे- १६ (पुणे ९, सोलापूर ७), कोल्हापूर- २ (कोल्हापूर २) औरंगाबाद-८ (औरंगाबाद ५, जालना १, परभणी २), लातूर- ३ (लातूर १, उस्मानाबाद १, नांदेड १), अकोला-३ (वाशिम २, यवतमाळ १).
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८५ पुरुष तर ३८ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७१ रुग्ण आहेत तर ४४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ८ जण ४० वर्षांखालील आहे. या १२३ रुग्णांपैकी ९२ जणांमध्ये ( ७५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २७१० झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू ३० एप्रिल ते १ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ९३ मृत्यूंपैकी मुंबई ४०, जळगाव -१६, ठाणे ८, सोलापूर -६, नवी मुंबई -५, रायगड -३, परभणी २, नाशिक २, वाशिम -२ , औरंगाबाद -२,पनवेल १, पालघर -१ , वसई विरार -१ उस्मानाबाद -१, धुळे -१,नांदेड १ आणि यवतमाळ – १ असे मृत्यू आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधीत रुग्ण- (४४,९३१), बरे झालेले रुग्ण- (१८,०९६), मृत्यू- (१४६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५,३६४)

ठाणे: बाधीत रुग्ण- (११,४२०), बरे झालेले रुग्ण- (४१७९), मृत्यू- (२५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६९८७)

पालघर: बाधीत रुग्ण- (१२३४), बरे झालेले रुग्ण- (४५८), मृत्यू- (३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७४०)

रायगड: बाधीत रुग्ण- (१२९३), बरे झालेले रुग्ण- (७०४), मृत्यू- (५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३२)

नाशिक: बाधीत रुग्ण- (१२९७), बरे झालेले रुग्ण- (९४२), मृत्यू- (७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८४)

अहमदनगर: बाधीत रुग्ण- (१७०), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९०)

धुळे: बाधीत रुग्ण- (१८७), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६७)

जळगाव: बाधीत रुग्ण- (८५२), बरे झालेले रुग्ण- (३६२), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९५)

नंदूरबार: बाधीत रुग्ण- (३९), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७)

पुणे: बाधीत रुग्ण- (८८२५), बरे झालेले रुग्ण- (४७७४), मृत्यू- (३७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६७५)

सोलापूर: बाधीत रुग्ण- (११२५), बरे झालेले रुग्ण- (४५७), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७६)

सातारा: बाधीत रुग्ण- (५८४), बरे झालेले रुग्ण- (२१२), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५०)

कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (६१२), बरे झालेले रुग्ण- (२६०), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४६)

सांगली: बाधीत रुग्ण- (१२७), बरे झालेले रुग्ण- (७१), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५२)

सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (८७), बरे झालेले रुग्ण- (१७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७०)

रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (३२९), बरे झालेले रुग्ण- (१२३), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०१)

औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (१७१४), बरे झालेले रुग्ण- (१११९), मृत्यू- (८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५०६)

जालना: बाधीत रुग्ण- (१५९), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८४)

हिंगोली: बाधीत रुग्ण- (१९४), बरे झालेले रुग्ण- (१४६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८)

परभणी: बाधीत रुग्ण- (७५), बरे झालेले रुग्ण- (२६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६)

लातूर: बाधीत रुग्ण- (१३१), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५५)

उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (९६), बरे झालेले रुग्ण- (४५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८)

बीड: बाधीत रुग्ण- (५१), बरे झालेले रुग्ण- (२९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२१)
नांदेड: बाधीत रुग्ण- (१५७), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८)

अकोला: बाधीत रुग्ण- (६७९), बरे झालेले रुग्ण- (३८५), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६०)

अमरावती: बाधीत रुग्ण- (२७२), बरे झालेले रुग्ण- (१५८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९८)

यवतमाळ: बाधीत रुग्ण- (१५५), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४)

बुलढाणा: बाधीत रुग्ण- (८०), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१)

वाशिम: बाधीत रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१)

नागपूर: बाधीत रुग्ण- (६६२), बरे झालेले रुग्ण- (४१०), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४१)

वर्धा: बाधीत रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४)

भंडारा: बाधीत रुग्ण- (३८), बरे झालेले रुग्ण- (१४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४)

गोंदिया: बाधीत रुग्ण- (६८), बरे झालेले रुग्ण- (५०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८)

चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (२८), बरे झालेले रुग्ण- (२५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३)

गडचिरोली: बाधीत रुग्ण- (४०), बरे झालेले रुग्ण- (१९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१)

इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (६४), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६)

एकूण: बाधीत रुग्ण-(७७,७९३), बरे झालेले रुग्ण- (३३,६८१), मृत्यू- (२७१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टीव्ह रुग्ण-(४१३९३)

(टीप-आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या ९३ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३८०४ झोन क्रियाशील असून आज एकूण १९ हजार १३२ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ७२.३७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.