कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रायगड जिल्हा न्यायालय कामकाजाच्या वेळेत बदल 

174

कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्रच जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.  उच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा न्यायालयाने न्यायालयाच्या कामकाजाच्या वेळेत बदल केला आहे. जिल्ह्यातील जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयाचे काम हे 31 मार्चपर्यंत 17 मार्चपासून साडेदहा ते अडीच या वेळेत होणार आहे. न्यायालयाची कामकाजाची वेळ ही अकरा ते दोन राहणार आहे. कोरोना विषाणूपासून बचाव व्हावा यासाठी मोजकीच महत्वाची कामे केली जाणार आहेत. विधी सेवाच्या माध्यमातून न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर हात स्वच्छ धुण्यासाठी सॅनिटायझरची सुविधाही करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण समिती सचिव संदीप स्वामी यांनी दिली आहे. न्यायालयीन कर्मचारी हे तोंडाला मास्क लावून काम करीत आहेत.

कोरोना विषाणू हा सध्या महाराष्ट्रातही जोर धरू लागला आहे. रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणू लागण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, समुद्र किनारी नागरिकांना प्रवेश बंदी केली आहे. जिल्ह्यातील शाळा, कॉलेजची बंद करण्यात आली आहेत. जिल्हा न्यायालयातही रोज नागरिक आपल्या कामानिमित्त येत असल्याने गर्दी होत असते.

कोरोना विषाणूमुळे जिल्हा न्यायालयातही खबरदारी घेण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने 14 16 मार्च रोजी काढलेल्या परिपत्रका आदेशानुसार जिल्हा न्यायालय प्रशासनानेही जिल्हा न्यायलायतील तसेच जिल्ह्यातील न्यायलायतील कामकाजाच्या वेळेत बदल केला. न्यायालयाचे कामकाज हे आता साडेदहा ते अडीच या वेळेत होणार आहे. रिमांड, महत्वाचे आदेश, जामीन अर्ज आणि 164 चे जबाब ही कामे न्यायालयात चालणार आहेत. दुपारी अडीच नंतर कोणीही न्यायालयात थांबू नयेत असे आदेश परिपत्रकात दिले आहेत. न्यायालयीन कामावेळी कर्मचारी हे मास्क लावून काम करणार आहेत.

विधी सेवा प्राधिकरण समितीमार्फत न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ हात धुण्यास सॅनिटायझरची सोय करण्यात आली आहे. कोरोना विषाणू पासून बचाव कसा करावा याबाबत टीव्ही आणि फलक संदेशाच्या माध्यमातून माहिती देण्यात येत आहे. 31 मार्चपर्यत पक्षकारांनी जिल्हा न्यायालय प्रशासनाला सहकार्य करून स्वतचाही कोरोना विषाणू पासून बचाव करावा असे आवाहन स्वामी यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रायगड जिल्हा न्यायालय कामकाजाच्या वेळेत बदल

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रायगड जिल्हा न्यायालय कामकाजाच्या वेळेत बदल | #MaxMaharashtra

Posted by Max Maharashtra on Wednesday, March 18, 2020