Home > Election 2020 > चंद्रकांत पाटलांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचा 'गेम'

चंद्रकांत पाटलांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचा 'गेम'

चंद्रकांत पाटलांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचा गेम
X

पुण्यातील कोथरूडमध्ये मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना आघाडीने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. चंद्रकांत पाटलांना घेरण्यासाठी आघाडीनं व्यूहरचना केल्याचं दिसून येतंय.

त्यामुळे आता चंद्रकांत पाटील यांची वाट खडतर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष महा-आघाडीकडून पाठिंबा देणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली.

पुण्यातील कोथरूडमधून विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलत चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली म्हणुन त्या नाराज असल्याचं म्हटलं जात होतं.

तसंच कोथरूडमधून स्थानिक उमेदवार द्यावा यासाठी चंद्रकांत पाटील यांना विरोध करण्यात आला होता. परंतु त्यानंतरही चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.

आता आघाडीने चंद्रकांत पाटील यांना घेरण्याची व्यूहरचना आखली असून त्यांनी मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated : 4 Oct 2019 10:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top