कोरोना अफवेवरून अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल !

अहमदनगरमधील मुकंदनगर फकीरवाडा भागाचा ताबा मिलिट्री घेणार असल्याची अफवा पसरवल्यावरून ताहिर शेख यांच्याविरोधात भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
२९ आणि ३० मार्च, अशा दोन दिवशी लागोपाठ ताहिर सुफियाना शेख युवा मंच ह्या वाॅटस्एप समुहात मिलिट्रीसंदर्भात पोस्ट करत होता. एकदा त्याने लिहिलं की मिलिट्रीने आपल्या भागाचा कब्जा घेतलाय. दुसऱ्या दिवशी त्याने लिहिलं की मस्जिदीजवळ मिलिट्रीचे लोक काही अधिकाऱ्यांसमवेत फिरत असून चौकशी केल्यास नाव आणि मोबाईल नंबर देऊ नका ! या माहितीत काहीच तथ्य नव्हतं. त्यामुळेच ताहिरविरोधात भादंवि १८८ अंतर्गत कारवाई करण्यात आलीय