‘हा’ मुख्यमंत्री निष्क्रीय आहे: नारायण राणे

आज भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला 4 महिन्यात 10 वर्षे मागे नेले. असा आरोप केला आहे.

राज्यात कोरोना मुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यास त्यावर उपाययोजना शोधण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. कोरोनाच्या प्रश्नांवर मंत्र्यांच्या बैठका सुद्धा आयोजीत केल्या जात नाहीत. मात्र, बदली प्रकरणावर तात्काळ बैठका होतात. झालेल्या बदल्या तात्काळ रद्द होतात. गेल्या चार महिन्यात हे सरकार १० वर्ष मागे नेलं.

असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला आहे.

काय म्हटलंय राणे यांनी…

मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर पडत नाही…

मुख्यमंत्री हे मातोश्रीच्या बाहेर सुद्धा पडत नाहीत. त्यामुळे मंत्रालय हे मुख्यमंत्री सांभाळत नसून अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांना जनतेच्या प्रश्नांची जाण नाही. ते जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाहीत. प्रशासन हाताळण्यास आणि निर्णय घेण्यास ते सक्षम नाहीत. राज्याला ना मुख्यमंत्री आहे ना मंत्रालय अशीही टीका राणेंनी केली.

मुख्यमंत्री निष्क्रीय आहे…

हाकेच्या अंतरावर मंत्रालय आहे. पण मंत्रालयात मुख्यमंत्रीच नाही. त्यामुळे हे सरकार खरच अस्तित्वात आहे का, जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसूच शकत नाही, तो कशाला हवा. हा मुख्यमंत्री निष्क्रीय आहे. हा प्रशासन चालवू शकत नाही. जनतेची परिस्थिती थांबवू शकत नाही. महाराष्ट्राच्या जनतेसाठी हे सरकार घातक आहे. महाराष्ट्रात कोरोनाने असंख्य मृत्यू होत आहे. त्यामुळेच हे सरकार सत्तेत राहणे योग्य नाही. त्यासाठीच मी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती.

असं राणे यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here