Home > News Update > उध्दव ठाकरेंची ही धमकी कुणाला?

उध्दव ठाकरेंची ही धमकी कुणाला?

उध्दव ठाकरेंची ही धमकी कुणाला?
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. केंद्र सरकार आणि राज्य सरकार हातात हात घालून काम करत आहे आणि या परिस्थितीतून देश पुन्हा पूर्ववत होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

यासोबतच आज दुपारी बांद्रा येथे झालेल्या गर्दीवरूनही त्यांनी धमकीवजा इशारा दिला आहे. १४ तारखेपासून रेल्वे सुरू होतील असं पिल्लू काही लोकांनी सोडलं आणि ही गर्दी जमल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. या घटनेला कोणताही रंग देऊ नका. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम केलं तर सोडणार नाही असा सज्जड दम मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. आपल्याकडे आगीचे बंब बरेच आहेत. मात्र त्यांना आग पसरवू देणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

अन्य राज्यातील सर्व कामगारांची काळजी घेऊ, घाबरण्याचं काही कारण नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी कामगारांना धीर देण्याचाही प्रयत्न केला.

बांद्राची घटना घडल्यानंतर राजकीय स्तरातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

Updated : 14 April 2020 4:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top