मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडियावर फेमस, मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला कोट्यवधीचे Views

शांत, संयम बोलणारे मुख्यमंत्री राज्यातील जनतेला भावत असल्याचं सोशल मीडियावरील आकडेवारी वरुन समोर येत आहे. अलिकडे टीआरपी मिळावी म्हणून स्टुडीओ मध्ये आवाजाची तीव्रता वाढवणारे Anchor, नेत्यांकडं पाहिलं तर लोकांना शांत बोलणारे लोकही आवडतात. हे यावरुन दिसून आलं आहे.

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्र्यांच्या एका पत्रकार परिषदेत मोठी गर्दी झाल्याचे फोटो समोर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या अनुषंगाने थेट संपर्क टाळून सोशल मीडियाचा आधार घेतला. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खूप मोठ्या प्रमाणात पाहिलं जात आहे.विशेषतः टिक-टॉक या सोशल मीडिया अॅपद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाषणे एक कोटी ७७ लाख जणांनी पाहिली आहेत. ठाकरे यांच्या अन्य भाषणांनाही सरासरी पन्नास लाखांहून अधिक जणांनी प्रतिसाद दिल्याची आकडेवारी आहे.

मुख्यमंत्री कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने #CMOmaharashtra या फेसबुक आणि @CMOMaharashtra या ट्विटर हॅण्डलवरून अनेकदा थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. या भाषणाच्या चित्रफिती यु-ट्यूबवरही आणि काही मुद्द्यांच्या अनुषंगाने फेसबुक संदेश म्हणूनही प्रसारित करण्यात आल्या आहेत. यात टिक-टॉक वर मुख्यमंत्र्यांना कोट्यवधींचे Views असल्याचे पाहायला मिळते. यातील काही भाषणांना एक कोटी ७७ लाख पासून ते ७८ लाख, ७७ लाख जणांनी प्रतिसाद दिला आहे.

या भाषणांनी प्रतिसादाचा सरासरी पन्नास लाखांहून अधिकचा टप्पा गाठल्याचे आढळते.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘घरातच राहा’ हा आणि अत्यावश्यक म्हणून बाहेर पडल्यास ‘दोन व्यक्तीमध्ये सुरक्षित अंतर’ चा नियम पाळा. असं सांगणाऱ्या व्हिडीओंना देखील मोठ्या प्रमाणात views आहेत.

फेसबुक लाईव्ह, ट्विटर वरील थेट प्रसारणामुळे कमीत कमी साधन सामुग्री आणि मनुष्यबळामुळे व्यापक स्तरावर संपर्क प्रस्थापित करणे शक्य होतं आहे.

सध्या राज्याच्या मंत्रिमंडळातील अन्य मंत्रीही समाज माध्यमाच्या या खुबीचा प्रभावीपणे वापर करत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या या आव्हानात्मक परिस्थितीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता संयुक्तिक आणि सकारात्मक ठरू लागला आहे.