Home > News Update > दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करणार - मुख्यमंत्री

दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करणार - मुख्यमंत्री

दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करणार - मुख्यमंत्री
X

पुण्यामधील हवेली तालुक्यातील कोंढवा बुद्रुक येथे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे संवेदना व्यक्त केली असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.

दुर्घटनेबाबत चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना नियमानुसार शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल, असेही ही त्यांनी सांगितले.

Updated : 29 Jun 2019 4:47 AM GMT
Next Story
Share it
Top