आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपद देण्यास तयार: देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis, deputy-cm-post, aaditya-thackeray, आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्रिपद, देवेंद्र फडणवीस, marathi, news, max maharashtra
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना सरकारचा भाग म्हणून पाहायला आवडेल असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यास कोणतीही अडचण नाही. आम्ही आताही त्यांना हे पद देऊ शकतो असं फडणवीस म्हणाले. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं.
आदित्य ठाकरे सध्या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभर दौरा करत आहेत. यामाध्यमातून महाराष्ट्रभर जनसंपर्क वाढवण्यावर त्यांचा भर आहे. अनेक दिवसांपासून त्यांच्या विधानसभा निवडणूक लढण्याच्याही चर्चा सुरू आहेत. याशिवाय शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्री होण्यावर भाष्य केलं होतं.
राज्यात जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा शिवसेना आणि भाजपमधल्या महत्वकांक्षा जागृत होतात. राज्यात मोठा भाऊ कोण हे दाखवण्यासाठी दोन्ही पक्षांनी धडपड सुरू असते. यासाठी दोन्ही पक्षांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत वेगवेगळे लढण्याचा निर्णय घेतला होता. यासर्वांमुळे येत्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांकडून असं वक्तव्य येणं म्हणजे नवीन समिकरणांची नांदी आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय.