लडाखमधील ३८ हजार चौरस मीटर जागा चीनच्या ताब्यात : संरक्षण मंत्री

2,310

लडाखमधील ३८ हजार चौरस मीटर जमीन चीनच्या ताब्यात असल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीन दरम्यान निर्माण झालेल्या सीमा वादावर अजूनही तोडगा निघालेला नाही, चीन आपल्या आडमुठ्या भूमिकेवर ठाम असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या निवेदनात सांगितले आहे. राजनाथ सिंह यांनी मंगळवारी लोकसभेत सीमा वादावर माहिती दिली.


ल़डाखमध्ये सुमारे ३८ हजार चौरस किलोमीटर जमिनीवर चीनने अनधिकृतपणे ताबा मिळवला असल्याची कबुलीही संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे. तर पाकिस्तानने 1963 मध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील ५ हजार १८० चौरस मीटर जागा चीनच्या ताब्यात दिली होती. त्यामुळे सुमारे ४३ हजार एकर जमीन चीनच्या ताब्यात असल्याची माहिती आता उघड झाली आहे. दरम्यान भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न चीनच्या सैन्यान केला होता पण भारताच्या जवानांनी हा प्रयत्न हाणून पाडला अशी माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान सीमेवर तणाव असून भारत-चीन दरम्यान या वादावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही, अशी माहितीही संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे. तसंच चीन सीमेबाबत आडमुठ्या भूमिकेवर ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले. सीमा वाद हा अत्यंत जटील मुद्दा असल्याचे दोन्ही देशांनी मान्य केले आहे. तसंच दोन्ही देशांदरम्यान प्रत्यक्ष ताबा रेषा निश्चित झालेली नाही, तसंच सीमा रेषेबाबत दोन्ही देशांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्याचबरोबर गलवान खोऱ्यात काय घडले होते याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली.

Comments