Home > News Update > बँकांच्या विलनीकरणामुळे ग्राहकांच्या अकाउंट नंबर आणि डेबीट कार्ड सुविधेत होणार आहेत हे बदल

बँकांच्या विलनीकरणामुळे ग्राहकांच्या अकाउंट नंबर आणि डेबीट कार्ड सुविधेत होणार आहेत हे बदल

बँकांच्या विलनीकरणामुळे ग्राहकांच्या अकाउंट नंबर आणि डेबीट कार्ड सुविधेत होणार आहेत हे बदल
X

पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँक यासह दहा बँकांचे एकत्रिकरण झाल्यानंतर या बँकांच्या ग्राहकांना एका नवीन बँकांशी व्यवहार करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत या ग्राहकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत.

उदाहरणार्थ, त्यांचे खाते क्रमांक बदलेल का? त्यांच्या जवळ असलेले डेबिट कार्ड चालेल की नाही? तसेच त्यांच्या ईएमआयचे काय होईल? यासाठी कोणत्या बँकेचा व्याज दर लागू होईल?

असे बरेच प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे जाणून घेणे महत्वाचे आहे. बँकांच्या एकत्रीकरणानंतर या बँकांच्या ग्राहकांसाठी कोणते बदल होतील आणि कोणते बदल होणार नाहीत, हे पाहुयात.

१. आपल्याजवळ असलेले चेकबुक आणि डेबिट कार्ड सुरू राहील का?

आपले सध्याचे चेकबुक आणि डेबिट सुरू राहील. यांचा वापर करण्यात सध्या कोणतीही समस्या नाही. बँका एका वर्षाच्या आत तुम्हाला नवीन चेकबुक आणि डेबिट कार्ड देऊ करतील.

२. कर्जाचा दर वाढेल की कमी होईल?

डिपॉजीट आणि लोन रेटमध्ये कोणताही बदल होणार नसला तरी (MCLR) एमसीएलआरला जोडलेल्या कर्जाच्या व्याजदरात नवीन दर री-सेट केल्यावरच बदल होईल. सामान्यत: हे दर एकतर सहा महिन्यात किंवा एका वर्षाच्या कालावधीमध्ये निश्चित केले जातात. जर आपण फिक्स डिपॉजीट करत असाल्यास किंवा नवीन कर्ज घेत अल्यास, एकत्रीकरणानंतर नवीन बँक तयार झालेली आहे तीच दर निश्चित करेल. त्याचप्रमाने बचत खात्यात मिळणाऱ्या व्याजाचाही दर देखील बदलू शकतो.

३. आपला अकाउंट नंबर बदलेल का?

आपला अकाउंट नंबर त्वरित बदलणार नाही. परंतु जर आपली बँकचे आपल्यापेक्षा मोठ्या बँकेत एकत्रीकरण झाले असेल तर काही कालांतराने आपला अकाउंट नंबर बदलण्याची शक्यता आहे. याचबरोबरीने आपला ग्राहक आयडी देखील बदलू शकतो.

४. टॅक्स रिफंड, इंश्योरेंस आणि म्युच्युअल फंडासाठी काय करावे लागेल?

जर आपणास नवीन अकाऊंट नंबर आणि आयएफएससी कोड देण्यात आला असेल तर रिफंडसाठी हा नंबर कर विभागात अपडेट करावा लागेल. तसेच मॅच्युरिटीची रक्कम मिळविण्यासाठी इंश्योरेंस कंपनीमध्ये हा नंबर अपडेट करावा लागेल. त्याचप्रमाणे एनपीएस खाते आणि म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकीसाठी देखील अकाउंट नंबर अपडेट करावा लागेल.

५. ईएमआय मॅन्डेड आणि ईसीएससाठी काय करावे लागेल.

ईएमआय मॅन्डेड, म्हणजेच खात्यातून पैसे कमी करण्याची परवानगी देणे आणि त्यासाठी ईसीएस करून घेण्यासाठी आपल्याला एक नवीन ऑनलाईन अथवा बँकेत जाऊन फॉर्म भरावा लागू शकतो. सध्या कर्ज घेणाऱ्यांसाठी, लॉकर होल्डर किंवा कार्ड धारकांसाठी लगेच काही बदल होणार नाहीत.

परंतू एकत्रीत झालेल्या बँकांची आयटी सिस्टम एक झाल्यावर बदल होण्याची शक्यता आहे. म्हणूनच, आपण आपला ई-मेल अकाउंट आणि फोन नंबर बॅंकेत जाऊन अपडेट करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला कोणत्याही नवीन बदलांची माहीती मिळू शकेल.

Updated : 6 Sep 2019 3:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top