Top
Home > News Update > ठाकरे सरकारच्या कर्जमाफीत कॉंग्रेसचे कारखानदार जेलमधुन सुटणार- चंद्रकांत पाटील

ठाकरे सरकारच्या कर्जमाफीत कॉंग्रेसचे कारखानदार जेलमधुन सुटणार- चंद्रकांत पाटील

ठाकरे सरकारच्या कर्जमाफीत कॉंग्रेसचे कारखानदार जेलमधुन सुटणार- चंद्रकांत पाटील
X

उध्दव ठाकरे यांनी शेतक-यांसाठी केलेली सरसकट कर्जमाफी फसवी असुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोघेही उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) फसवणुक करत असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. पुणे महापालिकेच्यावतीने शहरात स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

संबंधित बातम्या...

“ठाकरे सरकारने दिलेल्या कर्जमाफीतही भाजप सरकारने दिलेल्या कर्जमाफी (Farmers Debt Forgiveness) प्रमाणेच अटी आहेत. दिड लाखाहून कमी पीककर्ज असलेले शेतकरी आता राहिलेच नाहीत. मात्र, शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढून ते कर्ज कारखान्यासाठी वापरणारे अनेक कारखानदर आहेत” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

“शेतकऱ्यांच्या नावावर दोनशे कोटींपर्यंत कर्ज काढुन कारखान्यासाठी वापरणारे अनेक कारखानदर आहेत. त्यातील दोन साखर कारखान्यांची नावही मला माहीती आहेत आणि काही जण जेलमध्येही आहेत. या कर्जमाफीने ते सुटणार आहेत.” असा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पाहा व्हिडीओ...

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/781994598935087/?t=0

Updated : 28 Dec 2019 9:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top