Home > News Update > पत्नीच्या अपघाती मृत्युमुळे नैराश्यातून पतिची आत्महत्या

पत्नीच्या अपघाती मृत्युमुळे नैराश्यातून पतिची आत्महत्या

पत्नीच्या अपघाती मृत्युमुळे नैराश्यातून पतिची आत्महत्या
X

पत्नीचा अपघाती मृत्यू सहन न झाल्यामुळे सार्थक संजय बचाटे (२५) या युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गंगाखेड तालुक्यातील वडगाव येथे उघडकीस आली.

सार्थकचे गंगाखेड शहरात एक सर्व्हिसिंग सेंटर होते. 11 फेब्रु गंगाखेड-परळी रोडवर सार्थक आणि त्याच्या पत्नीचा अपघात झाला होता. या अपघातात सार्थकची पत्नी चंदा हिचा मृत्यू झाल्यापासून सार्थक हा नैराश्यात होता. गळफास लावण्यापूर्वी आपल्या पत्नीला उद्देशुन मोबाईलवर स्टेटस सुद्धा ठेवला होता.

“चंदाराणी मी तुला भेटन्यासाठी येत आहे, माझ्या मरणाला कोणीही जवाबदार नाही, आई-बाबा मी जातोय, अशी भावनात्मक पोष्ट लिहून त्याने आत्महत्या केली. सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गावाशेजारील शेतात एका लिंबाच्या झाडाला त्याने गळफास घेतला. या प्रकरणी गंगाखेड़ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून याचा पुढील तपास सपोनि राजेश राठोड करीत आहेत.

Updated : 12 March 2020 4:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top