Home > News Update > आपल्या देशात चमच्यांची कमी आहे का?- नितीन गडकरी

आपल्या देशात चमच्यांची कमी आहे का?- नितीन गडकरी

आपल्या देशात चमच्यांची कमी आहे का?- नितीन गडकरी
X

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadakari ) यांनी आपण सेक्रटरीला, आपल्या देशात चमच्यांची कमी आहे का? असा प्रश्न विचारण्याचा किस्सा सांगितला. पूर्वी आमच्या देशात उदबत्तीपासुन आईस्क्रीम खाण्याचे चमचेही चीनमधुन आयात व्हायचे. मी सेक्रेटरीला म्हणालो, अपने हिंदुस्तान मे चमचो की कमी पड गई क्या? आणि सभागृहात हशा पिकला. पुणे येथे आयोजित मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या उद्योग परिषदेच्या कार्यक्रमात हशा पिकला. देशभरातील उद्योग आणि व्यापार संबंधीत योजनांविषयी या कार्यक्रमात ते बोलत होते.

“उद्योगाचं विकेंद्रीकरण होणं आवश्यक आहे. पुणे मुंबई शहरांबाहेर उद्योग वाढतील यासाठी योजना सरकारने आखली आहे. कृषी, आदिवासी तसेच ग्रामीण क्षेत्राला डोळ्यासमोर ठेवून नवनवीन तंत्रज्ञान विकसित होणे आवश्यक आहे.” असं गडकरी यांनी सांगितलं आहे.

सोबतच मुंबई-दिल्ली महामार्ग, सागरी महामार्ग आणि हवाई मार्गांच्या विस्तारीकरणातुन उद्योगात आणि व्यवसायात होणारी वृद्धी होऊन देशात आयात कमी होऊन, निर्यात वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

Updated : 15 Nov 2019 10:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top