Home > News Update > चंद्रपूरच्या दारुसमर्थक उमेदवाराचा ‘दारू’नं पराभव

चंद्रपूरच्या दारुसमर्थक उमेदवाराचा ‘दारू’नं पराभव

चंद्रपूरच्या दारुसमर्थक उमेदवाराचा ‘दारू’नं पराभव
X

दारूबंदी असलेल्या चंद्रपूर येथील उमेदवार वनिता राऊत (Vanita Raut) यांनी विधानसभा निवडणूकीत उभे राहत दारूचे समर्थन करत आपला अजब जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. यात त्यांनी दारू पिण्याचा हक्क मिळायला हवा असे नमूद केले होते. कुटुंबीयांनी सोबत मिळून दारू पिल्यानंतर वाद भांडण होणार नाही असा अजब युक्तिवाद त्यांनी केला होता. मात्र या दारूचे समर्थन करणाऱ्या उमेदवाराला आपला स्टंट चांगलाच महागात पडल्याचे चित्र आहे. त्यांना निवडणूकीत केवळ २८६ एवढी मते प्राप्त झाली आहेत. दारू पिणाऱ्या लोकांची किमान दहा टक्के लोकसंख्या गृहीत धरली तरी या उमेदवारांना त्यांचीही मते मिळालेली दिसत नाहीत.

> समाजसेविका पारोमिता गोस्वामी दारुबंदीसाठी निवडणुकीच्या रिंगणात

> आमदार बच्चू कडूंनी 'या' कारणामुळे शिवसेनेला दिला पाठिंबा!

> ‘वाचनीय रविवार’ तुम्ही ‘या’ घडामोडी मिस तर नाही केल्या?

या जिल्ह्यात २०१५ पासून दारूबंदी आहे. विशेष म्हणजे येथील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील अनेकदा दारूबंदी उठवावी अशी घोषणा केली होती. काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर हे देखील अनेकदा आपल्या भाषणातून दारूबंदीचे समर्थन करताना दिसतात. त्यामुळे एका बाजूला गांधीजींच्या तत्वावर चालणारे काँग्रेसचे नेते या जिल्ह्यात दारूबंदीचे समर्थक असल्याचे चित्र आहे.

मात्र उघड उघड दारूचे समर्थन करणाऱ्या विधान सभा उमेदवार वनिता राऊत यांचा मतदारांनी दारून पराभव झाल्याची चर्चा चंद्रपुरात चांगलीच रंगली आहे.

Updated : 27 Oct 2019 7:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top