Home > News Update > कॅन्सरग्रस्त रुग्णांचा हॉस्पिटलबाहेर मुक्काम

कॅन्सरग्रस्त रुग्णांचा हॉस्पिटलबाहेर मुक्काम

कॅन्सरग्रस्त रुग्णांचा हॉस्पिटलबाहेर मुक्काम
X

जगभरात ४ फेब्रुवारी हा कर्करोग दिवस म्हणून पाळला जातो. या दिवशी जगभरात वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. कर्करोग संदर्भात जाणीव-जागृती निर्माण केली जाते, वेगवेगळ्या सोई-सुविधा देऊन रुग्णांना अनेक माध्यमातून मदत केली जाते. मात्र, काही ठिकाणी कर्करोग ग्रस्त लोकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात हाल होताना पाहायला मिळतात.

देशातील सर्वात मोठं कर्करोग ग्रस्त लोकांच रुग्णालय मुंबईमधलं टाटा रुग्णालय आहे. या रुग्णालयात देशभरातून कर्करोग ग्रस्त रुग्ण येत असतात. त्यामुळे या रुग्णालयात एवढी क्षमता नाही की, देशभरातून आलेल्या लोकांची सोय रुग्णालयात होऊ शकते. म्हणून या रुग्णालयाच्या बाहेर अनेक कर्करोग ग्रस्त नागरिक रस्त्यावर राहतात. उपचारासाठी आलेले रुग्ण कोणत्या राज्यातून येतात, रुग्णांना कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागतं, राहण्याच्या पर्यायी सोई आहेत का? याबद्दल जाणून घेतले असता, रुग्ण म्हणातात, “मागील २० दिवसापासून आम्ही आलो आहोत अजून आमचा उपचारासाठी नंबर लागलेला नाही, देशभरातील रुग्ण या रुग्णालयात येत असल्यामूळे प्रचंड प्रमाणात गर्दी या रुग्णालयात होते, यासाठी रुग्णालय प्रशासनाने रुग्णांसाठी सोई केल्या पाहीजेत, बाहेरील राज्यातून येणाऱ्या गोर-गरीब रुग्ण कूठे राहतील. तसंच रस्त्यावर झोपले की, रात्री पोलीस उठवतात, आम्ही जायचे कूठे? असं मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केलं.”

“रुग्णांचे होणारे हाल आणि राहण्याची सोय नाही, या संदर्भात या भागातील शिव सैनिकाला विचारले असाता त्यांनी सांगीतले की, आम्ही शिवसेनेच्या नगरसेविका यांच्या साहाय्याने येथील रुग्णांना पुरेपूर मदत करण्याचा प्रयत्न करत असतो, राहण्याची पण सोय करतो परंतू ज्यांना उशिर होतो त्या रुग्णांची आम्ही राहण्याची पूरक सोय नाही करु शकत नाही. रुग्णांच्या जेवणाची सोय लगंरच्या माध्यमातून आम्ही करुन दिली आहे.” असं यावेळी तेथील विभागातील शिवसैनिनी स्पष्ट केलं.

Updated : 4 Feb 2020 3:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top